घरताज्या घडामोडीCoronaVirus: मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा ३ मेपर्यंत लांबणीवर

CoronaVirus: मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा ३ मेपर्यंत लांबणीवर

Subscribe

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार मुंबई विद्यापीठाच्या सर्व लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा तसेच संलग्नित महाविद्यालयाच्या पदवीस्तरावरील प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या सर्व लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा ३ मे पर्यंत लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. ३ मे नंतर राज्य शासनाच्या निर्देशानुसार आणि तत्कालीन परिस्थितीनुसार परीक्षेसंदर्भात पुढील निर्णय घेतला जाईल.

१५ एप्रिल २०२० च्या महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार महाराष्ट्रातील लॉकडाऊनचा ३ मेपर्यंत वाढविण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने उन्हाळी सत्राच्या सर्व लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा तसेच संलग्नित कॉलेजच्या पदवीस्तरावरील प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या सर्व लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा ३ मेपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उन्हाळी सत्राच्या परीक्षेसंदर्भात ३ मे नंतर शासनाच्या निर्देशानुसार आणि तत्कालीन परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाईल.

- Advertisement -

परीक्षा अर्ज भरण्याच्या तारखाही लांबणीवर

२०२० च्या उन्हाळी सत्राच्या मे आणि जून मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या तारखाही पुढे ढकलण्यात आल्या असून त्याचे स्वतंत्र परिपत्रक निर्गमित करण्यात येईल.

२०२० च्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा

विद्याशाखा परीक्षा              संख्या
मानव्य विद्याशाखा               ९५
वाणिज्य व व्यवस्थापन           १०१
विज्ञान व तंत्रज्ञान                 ३८१
आंतरविद्याशाखीय अभ्यास       १८२
एकूण परीक्षा                      ७५९

- Advertisement -

कोरोनामुळे लॉकडाऊनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर युजीसी, राज्य शासन आणि विद्यापीठ परीक्षेसंदर्भात गांभीर्यपूर्वक विचार करीत आहे. अनेकांनी याबाबत सूचना केलेल्या आहेत, यासंदर्भात लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल. – डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरु, मुंबई विद्यापीठ


हेही वाचा – CoronaVirus Effect: पश्चिम रेल्वेचे ४२७ कोटींचे नुकसान!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -