घरताज्या घडामोडीडॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात सुरू होणार कोरोना तपासणी प्रयोगशाळा

डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात सुरू होणार कोरोना तपासणी प्रयोगशाळा

Subscribe

महाराष्ट्र शासनातर्फे नाशिक येथील मविप्र संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय येथे कोरोनाच्या तपासणीसाठी प्रयोगशाळा सुरू करण्याबाबत तयारी सुरू झाली. प्रस्तावित प्रयोगशाळेची पाहणी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी करत आढावा घेतला.

नाशिक येथे कोरोना वैद्यकीय प्रयोगशाळा व्हावी, यासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री छगन भुजबळ यांचेकडे पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टेस्टिंग लॅबच्या मागणीबाबत त्वरित कार्यवाहीबाबत अधिकाऱ्यांना आदेशीत केले होते. त्यानुसार मविप्र संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय येथे कोरोना तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. प्रयोगशाळेत विविध अद्ययावत तपासणी यंत्रसामुग्री बसविण्यास सुरवात झाली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी प्रयोगशाळेची पाहणी करत माहिती जाणून घेतली. प्रयोगशाळेच्या डॉक्टरांचे प्रशिक्षण सुरू असून लवकरच प्रयोगशाळा कार्यान्वित होणार आहे. या प्रयोगशाळेत कोरोनो सोबतच स्वाईन फ्लू व इतर साथीचे आजार यांचेही तपासणी होणार आहे. यावेळी डॉ वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाली पाटील, डॉ. एन.एस.पाटील आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -