घरCORONA UPDATEधक्कादायक : ठाण्यात कोरोनाबाधित रूग्णांची खासगी रूग्णालयाकडून लूटमार

धक्कादायक : ठाण्यात कोरोनाबाधित रूग्णांची खासगी रूग्णालयाकडून लूटमार

Subscribe

खासगी रूग्णालयात दाखल झालेल्या कोरोनाबाधित रूग्णांची लूटमार सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाबाधित रूग्णांच्या उपचाराचे अवघ्या चार दिवसांचे तब्बल ४६ हजार बील आकारले जात आहे.

ठाण्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत आहेत रूग्णालयातील सोयी सुविधांवर ताण पडत आहे. मात्र, खासगी रूग्णालयात दाखल झालेल्या कोरोनाबाधित रूग्णांची लूटमार सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाबाधित रूग्णांच्या उपचाराचे अवघ्या चार दिवसांचे तब्बल ४६ हजार बील आकारले जात आहे. तसेच कोरोनाबाधित रूग्णासाठी रूग्णवाहिका मोफत असतानाही खासगी रूग्णालयाकडून सुमारे ११ ते १५ हजार रूपये उकळले जात आहेत. त्यामुळे खासगी रूग्णालयावर राज्य सरकारने चाप लावावा, अशी मागणी ठाणेकरांमध्ये जोर धरू लागली आहे.

महापालिका आणि शासनाने नियुक्त केलेल्या रूग्णालयात मर्यादित सुविधा असल्याने अनेक कोरोनाबाधित रूग्ण हे खासगी रूग्णालयात दाखल होत आहेत. पण खासगी रूग्णालयाकडून त्यांची लूटमार सुरू असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. १७ एप्रिल रोजी कोरोनाची टेस्ट पॉझिटीव्ह आल्याने तरूण एका खासगी रूग्णालयात दाखल झाला. त्यांनी ४ दिवस एका खासगी रूग्णालयात उपचार घेतले. त्यांचे उपचार घेतल्यानंतर त्याची टेस्ट निगेटिव्ह आली. मात्र त्या तरूणाचे ४ दिवसाचे ४६ हजार रूपये बील आकारण्यात आले. कोरोनाबाधित रूग्णांना खासगी रूग्णालयातील रुग्णवाहिकेच्या सेवेसाठी ११ ते १५ हजार मोजावे लागत आहेत. केवळ तीन किलो मीटरचे अंतर असतानाही कार्डिकसाठी १५ हजार तर कोव्हीडसाठी ११ हजारांचे दर त्या तरूणाला सांगण्यात आले. मात्र कोविड रूग्णासाठी रुग्णवाहिका मोफत असल्याने त्या व्यक्तीने महापालिकेशी संपर्क केला. त्यानंतर महापालिकेने त्या रूग्णाला मोफत रुग्णवाहिका पाठवली. त्यामुळे खासगी रूग्णालयाकडून अशा प्रकारे रूग्णांची लूटमार सुरू आहे. खासगी रुग्णालय कोविड पेशंटकडून चार्जेस घेतात हे चुकीचे आहे. खासगी रुग्णालय नफा कमावित असतील तर थांबवलं पाहिजे अशीही मागणी त्या तरूणाने केली आहे. तसेच दुसऱ्या एका तरूणाला कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर रुग्णालयामधून रुग्णवाहिकेने जाण्यासाठी ११ हजार रूपये रुग्णवाहिकेचे चार्जेस आकारण्यात आले. मध्यवर्गीय कुटूंबाला हे चार्जेस परवडणारे नाहीत, त्यामुळे सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी केली.

- Advertisement -

मनसेकडून पर्दाफाश

खासगी रूग्णालयाकडून होत असलेल्या लुटमारचा पर्दाफाश मनसेने केला आहे. जवळच्या अंतरासाठी रूग्णांना रूग्णालयात पोहोचण्यासाठी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून हजारो रूपये आकारून सर्वसामान्य नागरिकांची लूट केली जात आहे. यावर वेळीच प्रशासनाने कारवाई करावी तसेच रुग्णवाहिकेचे दर हे किलोमीटरनुसार प्रशासनाने ठरवून द्यावे, अशी मागणी मनसेचे स्वप्निल महिंद्रकर यांनी केली आहे. लॉकडाऊन असल्यामुळे फक्त अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. पण रूग्णवाहिकाही कमी पडत असल्याचे माहिती पुढे येत आहे. तर १०८ ची सुविधा ही केवळ सरकारी रूग्णालयांकरिता असल्यामुळे खासगी रूग्णालयात रूग्णांना नेले जात नाही. याचा फायदा उठवित रूग्णवाहिकेसाठी अधिक भाडे आकारले जात आहे, यावर प्रशासनाने वेळीच यावर नियंत्रण आणण्याची मागणी महिंद्रकर यांनी केली. सामान्य नागरिकांना लुटणं गंभीर आहे. महात्मा फुले योजनेतंर्गत रुग्णांसाठी मोफत सुविधा आहेत पण काही रूग्णालये लुटमार करीत आहेत. या काळात लोकांना मदत केली पाहिजे, अशीही मागणी महिंद्रकर यांनी प्रशासनाकडे केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -