घरमुंबईCostal Road : …हे त्यांचे कामच आहे, कोस्टल रोडवरून आदित्य ठाकरेंचे फडणवीसांना...

Costal Road : …हे त्यांचे कामच आहे, कोस्टल रोडवरून आदित्य ठाकरेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर

Subscribe

मुंबई : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित कोस्टल रोडचे आज, सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. मुख्यमंत्रीपदी असताना केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून हा प्रकल्प मंजूर करून घेत त्यास सुरुवात केल्याचा दावा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे. त्याला ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले.

हेही वाचा – CM Eknath Shinde : तुम्ही काम नाही, अडथळे निर्माण केले; मुख्यमंत्री शिंदेंचा आदित्य ठाकरेंना टोला

- Advertisement -

कोस्टल रोडच्या उद्घाटनाच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. कोस्टल रोडच्या पार्श्वभूमीवर अनेक बैठका झाल्या. सगळ्या अडथळ्यांवर मार्ग काढले. हे सगळे का होऊ शकले तर राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी खंबीर होतो. मी पूर्ण ताकदीने या प्रकल्पाच्या मागे उभा राहिलो. सातत्याने चौकशी करून ज्या-ज्या ठिकाणी अडथळे निर्माण व्हायचे, ते त्यांनी दूर केले. त्यानंतर हा कोस्टल रोड सुरू होत आहे. जे लोक नुसते ट्विटर, इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर श्रेय घेत आहेत, यावरूनच त्यांच्यातील आणि आमच्यातील फरक काय, हे लोकांना कळले पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला.

- Advertisement -

यासंदर्भात राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीट केले आहे. कोस्टल रोडच्या रखडलेल्या उद्घाटनाच्या वेळी अर्ध्या उपमुख्यमंत्र्यांना आपले अर्धे भाषण आमच्यावर आधारितच करावे लागले. याचा अर्थ एकच आहे तो म्हणजे, मुंबई कोस्टल रोडबद्दल असलेलेी आमचे भावनिक कनेक्शन! उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई कोस्टल रोडचे पाहिलेले स्वप्न आणि ते पूर्ण करण्यासाठी केलेले प्रयत्न, यासाठी मी कृतज्ञता व्यक्त करतो, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Coastal Road : उद्धव ठाकरेंनी कोस्टल रोडचं प्रेझंटेशन दाखवून महापालिकेच्या निवडणुका लढवल्या – फडणवीस

अर्धे उपमुख्यमंत्री म्हणताता की, काही परवानग्या त्यांनी दिल्या होत्या, पण हे त्यांचे कामच आहे. तरीही, केंद्र सरकारकडून जवळपास तीन वर्षांचा विलंब झाला, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे. त्यावेळी या विलंबासंदर्भात ट्वीट करत केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता, ते सर्व माझ्या टाइमलाइनवर उपलब्ध आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

या विलंबाबरोबरच, अंशत: खुल्या केलेल्या कोस्टल रोडच्या उदघाटनाला सध्याच्या सरकारने विलंब केला, ही लाजिरवाणी बाब आहे. 19 फेब्रुवारीपासून अनेक वेळा उद्घाटनाची तारीख बदलण्यात आली आणि शेवटची तारीख शनिवार होती, ते सोमवार (आज) करण्यात आली, असे सांगून, भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार महाराष्ट्राचा अपमान करण्याची आणि मुंबईला त्रास देण्याची प्रत्येक संधी साधत आहे. सवयीप्रमाणे अर्धे उपमुख्यमंत्री श्रेय घेऊ शकतात, पण मुंबईकरांना सर्व माहीत आहे, असे त्यांनी सुनावले आहे.

हेही वाचा – Costal Road : कोस्टल रोडवरून श्रेयवाद, भाजपा नेते म्हणतात – जे मोठ्या मनाने वागतात…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -