घरमुंबईमुंबईत मेसेज असेल तर मिळणार कोरोना लस- महापौर

मुंबईत मेसेज असेल तर मिळणार कोरोना लस- महापौर

Subscribe

२ लाख २० हजार लसींचा नवीन साठा येणार असला तरी नोंदणी न करता थेट लसीकरण केंद्रावर जाऊ नये असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

मुंबईत कोरोना लसीचा साठा संपत आल्याने शुक्रवारी अनेक लसीकरण केंद्रावर तणावाचे वातावरण होते. मात्र केंद्राकडून लवकरच २ लाख २० हजार लसींचा साठा उपलब्ध होणार असल्याने आज (शनिवार), रविवार लॉकडाऊन दिवशीही नागरिकांना लस मिळणार आहे. परंतु ज्या नागरिकांची नोंदणी होऊन लसीचा मेसेज आला आहे अशांनाच लसीचा डोस मिळणार आहे. लसींच्या तुटवड्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

मुंबईत सध्या ४५ वर्षावरील सर्व नागरिकांना लस दिली जातेय. मात्र काही दिवसांपासून लसींचा साठा कमी असल्याने मुंबईतील अनेक केंद्रांवर गोंधळ उडाला होता. त्यामुळे लसीकरण मोहिमीचा वेग मंदावला होता. मात्र आता कोविशिल्ड लसीचे १ लाख ८० हजार डोस आणि कोव्हॅक्सिनचे ४६ हजार ६३० डोस मुंबईाला मिळणार आहे. मुंबईच्या अनेक लसीकरण केंद्रावर नागरिक कोरोना नियम न पाळता गर्दी करतात. याचा ताण आरोग्य यंत्रणेला सहन करावा लागतो. काही नागरिक नोंदणी करता थेट लस घेण्यासाठी येतात त्यामुळे प्रत्येक नागरिकाला समजावणे आरोग्य यंत्रणेला कठीण जाते. मात्र आता कोरोना लसीचा डोस घेण्यासाठी नागरिकांना नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून जाणे गरजेचे असणार आहे.

- Advertisement -

मुंबईत शुक्रवारी सकाळपर्यंत ८६ हजार लस साठा उपलब्ध होता. त्यामुळे १२० लसीकरण केंद्रांपैकी ७१ केंद्रांवर लसीकरण मोहिम राबवणे शक्य झाले नाही. त्यामुळे ४९ केंद्रावरच लसीकरण सुरु होऊन त्यापैकी १९ केंद्रावरील लस दुपारनंतर संपल्या. दरम्यान २ लाख २० हजार लसींचा नवीन साठा येणार असला तरी नोंदणी न करता थेट लसीकरण केंद्रावर जाऊ नये असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -