घरताज्या घडामोडीLive Updates: सर्वपक्षीय बैठकीत लॉकडाऊनबाबत होणार निर्णय?

Live Updates: सर्वपक्षीय बैठकीत लॉकडाऊनबाबत होणार निर्णय?

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. महाराष्ट्राच्या लॉकडाऊनसंबंधात या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती असणार आहे. आज सायंकाळी ५ वाजता बैठकीला सुरुवात होणार आहे.


पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, गोळाबारात पाच जणांचा मृत्यू

- Advertisement -

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुक २०२१ मधील चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. मात्र या मतदानादरम्यान हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. या हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

- Advertisement -

फडणवीस चालू देतील तोपर्यंत ठाकरे सरकार चालेल – रामदास आठवले

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून विरोधी पक्ष सातत्याने सरकार पडणार अशी भविष्यवाणी करीत आहेत. आज रिपाइंचे प्रमुख आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील आता तजकरे सरकारबद्दल वक्तव्य केलं आहे. जोपर्यंत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सरकार चालू देतील तोपर्यंत हे सरकार चालणार, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते इंदापूर इथे बोलत होते.


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्य सरकारने दिवसा जमावबंदी, रात्रीची संचारबंदी आणि विकेंडला लॉकडाऊन लागू केले. आज लॉकडाऊनचा पहिलाच दिवस असून या लॉकडाऊनला विरोधत करत भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा येथे ‘भीक मागो’ आंदोलन केले. त्याचप्रमाणे उद्यापासून नो लॉकडाऊन, असे देखील म्हणाले. त्याचप्रमाणे यावेळी त्यांनी राजकारणात घडत असलेल्या विविध मुद्द्यांवर टीका केली. यामध्ये सचिन वाझे, अनिल देशमुख या विषयांवरुन राज्य सरकारवला खडेबोल सुनावले.


देशात नव्याने १ लाख ४५ हजार नव्या रुग्णांची नोंद

देशात वाढत्या कोरोना संसर्गामुळे अनके राज्यांमध्ये कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र तरीही रुग्णांसख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या २४ तासामध्ये देशात १ लाख ४५ हजार ३४८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडा देखील घडकी भरवणार आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ७९४ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले.


नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे वयाच्या ५५ व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले आहे. अंतापूरकर यांच्यावर मुंबईतील बॉम्बे रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. मात्र, उपचारा दरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवली आहे. रावसाहेब अंतापूरकर यांना सुरुवातीला कोरोनाची लक्षणे जाणू लागली. त्यामुळे त्यांची तपासणी केली असता, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना सुरुवातीला नांदेडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती खालवल्यानंतर त्यांना मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.


वॉर रुममधून मुंबईकरांना बेड्स उपलब्ध करुन देणार- महापौर

मुंबईत वाढत्या रुग्णसंख्येचा आढावा घेण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज बॉम्बे हॉस्पीटलला भेट दिली. यावेळी वॉर रुममधून मुंबईकरांना बेड्स उपलब्ध करुन देणार अशी आश्वासन महापौरांनी दिले.  यावेळी बोलताना महापौर म्हणाल्या, रुग्णालय अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता बॉम्बे हॉस्पीटलला सध्या २०० बेड आवश्यकता आहे. त्यामुळे येत्या सोमवारपर्यंत १५० बेड रुग्णालयाला दिले जाणार आहेत. १० बेड राखीव ठेवले जाणार आहे. तेही अशा रुग्णांना ज्यांना या रुग्णालयावर विश्वास असतो म्हणून उपचारासाठी भर्ती व्हायचे असते. मात्र १० वर एकही बेड आधीच राखीव ठेवले जाणार नाहीत. दरम्यान महौपांनी आज रुग्णालयांमधील रेमिडेसिवीर इंजेक्शन साठ्याची देखील पाहणी केली.


राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्यात विकेंडला कडक लॉकडाऊन आणि इतर वेळी संचारबंदी आणि जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे लसीकरण देखील तितकेच महत्त्वाचे असल्याने राज्यातील अनेक नागरिक लसीकरण करत आहेत. मात्र, राज्यातील आता लसीचा साठा संपुष्टात आला आहे. त्यामुळे शुक्रवारी राज्यातील अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद करण्यात आली. एकीकडे केंद्र सरकारकडून लसीचा साठा देण्यात येत असल्याचे बोले जात असताना दुसरीकडे राज्यात पुरेसा साठा दिला जात नसल्याचे आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील वस्तुस्थिती मांडत राज्याला किती लसीचा साठा दिला जातो आणि इतर राज्याला किती देण्यात येतो, याबाबत माहिती देण्यात आली. यावरुन राजकारण रंगू लागले. दरम्यान, ‘जर महाराष्ट्राच्या लस पुरवठ्यात वाढ करण्यात आली नाही, तर सीरम इन्स्टिट्यूटमधून इतर राज्यात लस घेऊन जाणारी वाहने बाहेर पडू देणार नाही’, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इशारा दिला आहे.


रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध करुन द्यावा आणि रेमडेसिवीरचा काळा बाजार थांबवा पॉझिटिव्ह रुग्णांनी बेड उपलब्ध करुन द्या, या मागणीसाठी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या नातेवाईकांनी केले नाशिकमधील मेहेर सिग्नलवर ठिय्या आंदोलन.


राज्याचे नवे पोलीस महासंचालक संजय पांडे करणार परमबिर सिंह यांची चौकशी


राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून कडक निर्बंध जारी करूनही परिस्थितीत फारसा फरक पडताना दिसत नाही. हे लक्षात घेऊन राज्य सरकार पुढील आठवड्यापासून कडक लॉकडाऊनचा विचार करत आहे. यासाठी शनिवार १० एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. राज्यात ३० एप्रिलपर्यंत कोरोनाची मोठी लाट पसरणार असल्याचा अंदाज असल्याने तीन आठवड्याच्या लॉकडाऊनविषयी सरकार निर्णय घेण्याची दाट शक्यता असून तसे स्पष्ट संकेत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.


बिल्डर एक फ्लॅट अनेकांना विकू शकणार नाही

प्रत्येकाचे स्वप्न असते, आपले स्वत:चे असे घर असावे आणि ते घर खरेदी करण्यासाठी ती व्यक्ती मेहनत घेऊन आयुष्य भराची पुंजी जमा करते. ती जमा केलेली पुंजी एखाद्या बिल्डरला देऊ करुन घर खरेदी करते. मात्र, बऱ्याचदा पैसे दिल्यानंतर ते घर आपले झालेच नाही. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येते. त्यानंतर अनेक जण आपली फसवणूक झाल्याचे सांगत पोलीस स्थानकात तक्रार करण्यासाठी जातात. मात्र, त्याचा काहीही फायदा होत नाही. कारण कायद्यात याबाबत काहीच तरतूद नसल्यामुळे त्यावर कारवाई होऊ शकत नाही. मात्र, आता असे झाले तर काळजी करु नका, कारण रेराच्या नव्या कायद्यानुसार तुमची अशी फसवणूक होणार नाही.


सरसंघचालक डॉ. मोहन भागवत कोरोना पॉझिटिव्ह; प्रकृती स्थिर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झाली आहे. (RSS Chief dr Mohan Bhagwat Corona Positive) संघाने शुक्रवारी ट्विटकरत याबाबतची माहिती दिली आहे. मोहन भागवत यांना काही लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी आरटीपीसीआर टेस्ट केली. या चाचणीनंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर नागपुरातील किंग्जवे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -