घरमनोरंजन'मुळशी पॅटर्न'चे दिग्दर्शक,अभिनेते प्रवीण तरडेंच्या कारला अपघात

‘मुळशी पॅटर्न’चे दिग्दर्शक,अभिनेते प्रवीण तरडेंच्या कारला अपघात

Subscribe

पुण्यातील सासवडजवळ हिरवे गावात त्यांच्या गाडीला अपघात

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण तरडे यांच्या कारला मंगळवारी रात्री अपघात झाला. हा अपघात रात्री साधारण ११ वाजेच्या सुमारास पुण्यातील सासवडजवळ हिरवे गावात त्यांच्या गाडीला अपघात झाला. हा अपघात होण्यापुर्वी अभिनेते प्रविण तरडे यांच्यासोबत कार्यकारी निर्माते विशाल चांदणे आणि अभिनेते रमेश परदेशी देखील होते. सुदैवाने या अपघातामध्ये कोणालाही कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही.

- Advertisement -

हेही वाचा – प्रसिद्ध गायक आनंद शिंदेच्या गाडीला अपघात


अशी घडली घटना

प्रवीण तरडे, विशाल चांदणे आणि अभिनेते रमेश परदेशी हे कारने जात होते. हिवरे गावात महादेव मंदिरासमोर त्यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही. कारमध्ये असणाऱ्या एअर बॅगमुळे त्याचा जीव बचावले असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सासवड पोलिसांनी घटनास्थळावर तातडीनं धाव घेतली. प्रविण तरडे, विशाल परदेशी आणि विशाल चांदणे हे सुखरुप आहेत. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन त्यांच्या चाहत्यांना करण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -