घरमुंबईक्रेडीट कार्डचा दुरुपयोग करून महिलेकडून ७५ लाख रुपयांचा गंडा

क्रेडीट कार्डचा दुरुपयोग करून महिलेकडून ७५ लाख रुपयांचा गंडा

Subscribe

सुमारे 75 लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी फातिमा अब्दुल जब्बार शेख या 32 वर्षांच्या महिलेस बीकेसी पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर तिला वांद्रे येथील लोकल कोर्टाने बुधवार 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कंपनीने दिलेल्या क्रेडिट कार्डचा दुरुपयोग तसेच बोगस बिल सादर करुन तिने कंपनीच्या बँक खात्यातून या पैशांचा अपहार करुन फसवणूक केल्याचा आरोप आहे.

वांद्रे येथील बीकेसी परिसरात एका खाजगी कंपनी असून यातील तक्रारदार याच कंपनीत एमडी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कंपनीत 1 सप्टेंबर 2015 रोजी फातिमा शेख ही सहाय्यक अकाऊंट म्हणून रुजू झाली होती. कंपनीच्या दैनदिन आर्थिक व्यवहारासाठी तिला कंपनीने एका खाजगी बँकेचे क्रेडिट कार्ड दिले होते. याच क्रेडिट कार्डचा तिने दुरुपयोग केला होता. तसेच बोगस आर्थिक व्यवहाराचे बिल सादर करुन तिने काही वर्षांत कंपनीच्या बँक खात्यातून लाखो रुपयांचा घोटाळा केला होता.

- Advertisement -

गेल्या वर्षी एका कार्यक्रमासाठी दिड ते पावणेदोन लाख रुपये खर्च झाला असताना तिने साडेचार ते पावणेपाच लाख रुपयांचा खर्च झाल्याचे नोंदी करुन त्याचे बोगस बिल सादर केले होते. हा प्रकार वरिष्ठांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्याची शहानिशा सुरु केली होती. यावेळी फातिमाने गेल्या काही वर्षांत कंपनीच्या क्रेडिट कार्डचा दुरुपयोग करुन बोगस बिल सादर करुन त्याची खोटी नोंद करुन बँक खात्यातून 75 लाख रुपयांचा अपहार करुन कंपनीची फसवणुक केली होती.
हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी फातिमा शेखविरुद्ध बीकेसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर तिच्याविरुद्ध बोगस दस्तावर सादर करुन कंपनीच्या पैशांचा अपहार करुन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. याच गुन्ह्यांत तिला पोलिसांनी अटक केली असून सध्या ती पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -