घरमुंबईकाका-पुतण्याच्या भेटीवर ठाकरे गटाकडून बोचरी टीका; धर्म-अधर्माचा निर्णय घेता आला पाहिजे...

काका-पुतण्याच्या भेटीवर ठाकरे गटाकडून बोचरी टीका; धर्म-अधर्माचा निर्णय घेता आला पाहिजे…

Subscribe

मुंबई : सत्ताधारी पक्षाच्या एनडीए (NDA) आघाडीला आव्हान देण्यासाठी आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांच्या ‘इंडिया’ (India) आघाडीची एकजूट बांधण्याचा प्रयत्न होत आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबईत  (Mumbai) ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक होणार आहे. परंतु त्याआधी पुण्यात उद्योगपतीच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात झालेल्या गुप्त भेटीवरुन सध्या राज्याच्या राजकारणात उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. याच भेटीमुळे ठाकरे गटही आक्रमक झाला आहे. धर्म-अधर्माचा निर्णय घेता आला पाहिजे, अशी बोचरी टीका ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी केली आहे. यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवरही (Modi Government) निशाणा साधला आहे. (Criticism from Thackeray faction on uncle nephew visit One should be able to decide between religion and non-religion)

हेही वाचा – ‘INDIA’ : मुंबई बैठकीआधीच खडाखडी; काँग्रेस-आपमध्ये ‘या’मुळे वादाची ठिणगी

- Advertisement -

काका-पुतण्याच्या भेटीवर बोलतान अरविंद सावंत म्हणाले की, दोघांच्या भेटीमुळे राज्यात संभ्रम निर्माण होत आहे. ज्यांनी तो निर्माण केला आहे, त्यांनी त्यांचं निवारण करायला पाहिजे. महाभारताच्या युद्धात कौरव आणि पांडव भाऊ-भाऊ होते. त्यामुळे धर्म-अधर्माचा निर्णय घेता आला पाहिजे, असा टोला अरविंद सावंत यांनी शरद पवार आणि अजित पवार यांना लगावला. मात्र दुसरीकडे शरद पवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपण ‘इंडिया’ आघाडीसोबत राहणार असल्याचे स्पष्ट करताना भाजपा समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे आता ‘इंडिया’ आघाडीत फुट पडणार का? हे पाहावे लागेल.

हेही वाचा – Sharad Pawar : लहान लोकांवर भाष्य करणार नाही; अजित पवारांवर निशाणा साधताना ‘त्या’ ऑफरवर केले भाष्य

- Advertisement -

शिवसेना उद्धव ठाकरेंची हे मोदींना सुद्धा कळलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणावर अरविंद सावंत यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की, त्यांनी स्वातंत्रदिनी केलेले हे पंतप्रधान म्हणून होते की, भाजपाचे नेते म्हणून? असा प्रश्न उपस्थित करताना सावंत म्हणाले की, येणाऱ्या निवडणुकीसाठी मोदी यांचं कालचं भाषण होत. त्यांना कळून चुकले आहे की, ‘इंडिया’ आघाडी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना मोठं आव्हान देणार आहे. महाराष्ट्र सदनमधील बैठकीतच त्यांनी सांगितलं होतं, भाजपाने नाही शिवसेनेने युती तोडली. कारण त्याचं मोदींचं शिवसेनेकडे सगळ्यात जास्त लक्ष आहे. शिवसेना उद्धव ठाकरेंची आहे हे आता पंतप्रधान मोदींना सुद्धा कळून चुकलं आहे, असा टोला अरविंद सावंत यांनी लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -