Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश 'INDIA' : मुंबई बैठकीआधीच खडाखडी; काँग्रेस-आपमध्ये 'या'मुळे वादाची ठिणगी

‘INDIA’ : मुंबई बैठकीआधीच खडाखडी; काँग्रेस-आपमध्ये ‘या’मुळे वादाची ठिणगी

Subscribe

‘INDIA’ : सत्ताधारी पक्षाच्या एनडीए (NDA) आघाडीला आव्हान देण्यासाठी आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांच्या ‘इंडिया’ (India) आघाडीची एकजूट बांधण्याचा प्रयत्न होत आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबईत ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक होणार आहे. मात्र त्यापूर्वीच काँग्रेस (Congress) आणि आम आदमी पक्षाच्या (Aap) प्रवक्त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे दोन्ही पक्षातील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात ‘इंडिया’ आघाडीला धक्का बसणार का? हे पाहावे लागेल. (INDIA Khadakhari before Mumbai meeting; Controversy sparks between Congress-AAP due to this)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत के सी वेणुगोपाल आणि इतर ज्येष्ठ नेत्यांचा समावेश होता. बैठकीनंतर काँग्रेसच्या नेत्यांकडून दिल्लीतील सातही लोकसभा जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय झाला असल्याचे वक्तव्य केले आहे. तसेच या बैठकीत ‘आप’सोबत आघाडी करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – Article 370 : आधी करीत होती मोदी सरकारवर टीका आता एकदमच बदलले तिचे सूर; वाचा कोण ती?

केजरीवाल सरकारची धोरणे उघड करण्यासाठी पोल खोल काढणार

काँग्रेस नेते अनिल चौधरी म्हणाले की, काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करून लढणार आहे. यावेळी त्यांना दिल्लीत आम आदमी पक्षासोबत आघाडी करून लोकसभा निवडणूक लढवणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले की, आम आदमी पार्टी किंवा युतीबाबत आमची चर्चा झाली नाही, आमचा स्वतःचा मार्ग आहे. असे सांगतानाच त्यांनी अरविंद केजरीवाल सरकारची धोरणे उघड करण्यासाठी आम्ही पोल खोल यात्रेतून सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे अनिल चौधरी यांनी सांगितले. तसेच दारू घोटाळ्याप्रकरणी आमच्या तक्रारीवरून अनेक कारवाई करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – Panipat Voilence : नूहनंतर पानिपमध्ये वातावरण तापले; धार्मिकस्थळात घुसून युवकांची घोषणाबाजी

‘इंडिया’ आघाडीत राहण्याला काहीच अर्थ नाही

दिल्ली काँग्रेसच्या भूमिकेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना ‘आप’चे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी म्हटले की, काँग्रेसच्या भूमिकेवर आपचे केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल. आपची राजकीय समिती आणि ‘इंडिया’ आघाडीची एक बैठक होईल. त्यात पुढील निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले. याचदरम्यान, ‘आप’ प्रवक्त्या प्रियांका कक्कड यांनी म्हटले की, दिल्लीमध्ये आघाडी होणार नसेल तर, ‘इंडिया’ आघाडीत राहण्याला काहीच अर्थ नाही. हा वेळेचा अपव्यय आहे. मुंबईत होणाऱ्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत सहभागी व्हायचे की नाही, याबाबत पक्ष नेतृत्व निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हटले.

‘इंडिया’ आघाडीला धक्का बसणार?

दिल्लीत आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजपा असे तीन प्रमुख पक्ष आहेत. सत्ताधारी पक्षाच्या एनडीए (NDA) आघाडीला आव्हान देण्यासाठी लोकसभा निवडणुकीसंदर्भात एका व्यासपीठावर आलेल्या विरोधी पक्षांमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचा समावेश आहे. असे असताना दिल्लीतील सर्व जागांवर काँग्रेसने एकट्याने लढण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे ‘इंडिया’ आघाडीला धक्का बसणार का? हे येत्या काही दिवसात समजले.

- Advertisment -