घरअर्थजगतDebt : एकीकडे नरेंद्र मोदींच्या 'मित्रांची' संपत्ती वाढतेय, तर दुसरीकडे..., ठाकरे गटाची...

Debt : एकीकडे नरेंद्र मोदींच्या ‘मित्रांची’ संपत्ती वाढतेय, तर दुसरीकडे…, ठाकरे गटाची टीका

Subscribe

मुंबई : भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असली तरी, यासोबतच देशावरील कर्जाचा बोजाही वाढत चालला आहे. तशी आकडेवारीच समोर आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर या तिमाहीत देशाचे एकूण कर्ज 2.47 ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच 205 लाख कोटी रुपयांवर पोहोचल्याची माहिती एका अहवालात देण्यात आली आहे. यावरून ठाकरे गटाने मोदी सरकारवर जोरदार टीकस्त्र सोडले आहे.

हेही वाचा – PM Modi : नव्या महालात 146 खासदारांची मुंडकी उडवून… संजय राऊत यांचा हल्लाबोल

- Advertisement -

मागील आर्थिक वर्षाच्या जानेवारी-मार्च तिमाहीत, एकूण कर्ज 2.34 ट्रिलियन डॉलर्स म्हणजे सुमारे 200 लाख कोटी रुपये होते. Indiabonds.comचे सह-संस्थापक विशाल गोयंका यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) आकडेवारीचा हवाला देऊन केंद्र आणि राज्यांवर कर्जाची आकडेवारी दिली आहे. केंद्र सरकारचे कर्ज सप्टेंबर तिमाहीत 161.1 लाख कोटी रुपये होते, तर मार्च तिमाहीत 150.4 लाख कोटी रुपये होते. यासोबतच, एकूण कर्जामध्ये राज्य सरकारांचा वाटा 50.18 लाख कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. या काळात अमेरिकन डॉलरचे मूल्य वाढल्याने या कर्जाच्या आकडेवारीवरही परिणाम झाला आहे. मार्च 2023 मध्ये एक डॉलर 82.5441 रुपये होता, जो आता 83.152506 रुपये झाला असल्याचे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही (IMF) या कर्जाबाबत भारताला इशारा दिला आहे. हे सरकारी कर्ज मध्यम कालावधीत जीडीपीच्या 100 टक्क्यांच्यावरही जाऊ शकते. यामुळे दीर्घ कालावधीसाठी कर्ज परतफेड करण्यात समस्या येऊ शकतात, असे आयएमएफने म्हटले आहे. यावर केंद्र सरकारने असहमती दर्शवत सरकारी कर्जाची जोखीम खूप कमी आहे. कारण अधिकतर कर्ज हे रुपयात असल्याचे स्पष्ट केले होते.

हेही वाचा – Sanjay Raut: सलिम कुत्ता मोकळा सुटला…; संजय राऊत यांचा फडणवीसांकडे रोख

पण यावरून ठाकरे गटाने ट्वीट करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांना लक्ष्य केले आहे. आपण प्रत्येकजण कर्जबाजारी आहोत. देशाचे नागरिक म्हणून आपल्या प्रत्येकावर 1.40 लाख रुपयांच्या कर्जाचे ओझे आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मित्रांची’ संपत्ती वाढत आहे, तर दुसरीकडे सामान्य माणसाच्या खिशाला दिवसेंदिवस कात्री लागत आहे, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

मागच्या 9 वर्षांमध्ये देशावरचा कर्जाचा बोजा 192 टक्क्यांनी वाढला आहे. याचा अर्थ आपल्या डोक्यावरचे कर्जही वाढत चालले आहे. याचे देशातील प्रत्येक नागरिकाशी गणित मांडायचे तर आज आपल्या प्रत्येकावर 1.40 लाख इतके कर्ज आहे. काही मूठभर उद्योगपतींची चांदी चालली असताना सर्वसामान्य मात्र दिवसेंदिवस कर्जाच्या खाईत लोटले जात आहे. मुठभरांना हव्या तितक्या सोयी-सवलती मिळत आहेत. ज्यांच्या जीवावर हे सरकार निवडून आले, त्या सर्वसामान्य जनतेचे मात्र यांना सोयरसुतक राहिलेले नाही, असेही ठाकरे गटाने म्हटले आहे.

हेही वाचा – WFI : मोठी बातमी! मोदी सरकार अखेर सरसावले; कुस्ती महासंघाची मान्यता रद्द

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -