घरमुंबईदख्खनची राणी झाली ८९ वर्षांची

दख्खनची राणी झाली ८९ वर्षांची

Subscribe

भारतीय रेल्वेची महाराणी असलेली दख्खनची राणी अर्थात डेक्कन क्वीन शुक्रवारी ८९ वर्षांची झाली. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईला रेल्वे मार्गाने जोडणार्‍या प्रवाशांची लाडक्या ‘दख्खनच्या राणी’ला शनिवार १ जून रोजी ९० वर्षात पदार्पण केले आहे. तर पंजाब मेलला सुद्धा १ जून १०७ वर्षापूर्ण होत आहे. त्यामुळे शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर ‘दख्खनच्या राणी’च्या वाढदिवस करण्यांत येणार आहे.

स्वतंत्रपूर्व काळात म्हणजे जेव्हा भारतावर इंग्रजांची राजवट होती. तेव्हा ब्रिटिशांनी ग्रेट इंडियन पेनिनसुला या रेल्वे कंपनीने पहिली लक्झरीयस ट्रेन सेवा म्हणून 1 जून 1930 रोजी मुंबई-पुणे मार्गावर ‘डेक्कन क्वीन’ एक्सप्रेस सुरू केली होती. त्यास शनिवारी 89 वर्षे पूर्ण होत आहेत. ही भारतातील पहिली अति जलद गाडी होती. सुरुवातीला या गाडीतून फक्त ब्रिटिश लोकच प्रवास करू शकत होते. गाडीतून प्रवास करण्याची भारतीयांना परवानगी नव्हती. पुढे १९४३ मध्ये या गाडीतून प्रवास करण्याची परवानगी भारतीयांना देण्यात आली. तेव्हापासून या गाडीकडे प्रवाशांचा जो ओघ सुरू झाला तो आजही कायम आहे. आशिया खंडातील विद्युतीकरणावर धावणारी पहिली इंटरसिटी ट्रेनही डेक्कन क्वीन आहे. इतकेच नव्हे तर देश-विदेशातून अनेक अ‍ॅवार्ड या ‘दख्खनच्या राणी नावाने आहे. विशेष म्हणजे या भारतीय रेल्वेची महाराणी ही एकमेव प्रवासी ट्रेन गेली ८९ वर्षं खंडाळ्याच्या घाटातून मुंबई ते पुणे धावत आहे. या गाडीला लवकरच एलएचबी डबे लावण्यात येऊन ‘पुशपूल’ तंत्राने डबल इंजिन लावून तिचाही वेग वाढविण्याची मध्य रेल्वेची योजना आहे. सध्या या गाडीला आयसीएफचे पारंपरिक डबे असून तिला असलेल्या अनोख्या ‘डायनिंग कार’ (धावते उपाहारगृह) एलएचबी तंत्राची डायनिंग कार तयार करावी लागणार आहे.

- Advertisement -

डेक्कन क्वीन होणार अत्याधुनिक
या दख्खनच्या राणीला अत्याधुनिक बनविण्यासाठी ‘एलएचबी’ कोचची जोड देणार आहे. या गाडीचे वैशिष्ठ असलेल्या डायनिंग कार’ (धावते उपाहारगृह) सुद्धा एलएचबी कोची असावी यासाठी मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे मागणी केली होती. त्यानंतर आता एलएचबी’ डब्यांची डायनिंग कार खास तयार करण्याची ऑर्डर सुद्धा देण्यात आली आहे. तसेच सह्याद्रीच्या पर्वतरांगा नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी मध्य रेल्वेकडन व्हिस्टाडोम हा अत्याधुनिक कोच लावण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिली आहेत.

दख्खनच्या राणीचा इतिहास दोन शहरांना जोडणारा आहे. आज या गाडीला ८९ वर्षे पूर्ण झाली आहेत. ऐतिहासिक डेक्कन क्वीनच्या नेहमी वेळेत धावत असल्यामुळे मुंबई आणि पुण्याचे प्रवासी आनंदाने प्रवास करत आहे. या गाडीला ८९ वर्षाच्या इतिहास असल्यामुळे या दोन शहराच्या मध्ये वाहतुकीचे मुख्य दुवा ठरला आहे.
सुनिल उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -