घरमुंबईठाण्यात १० रुपयात जेवणाची थाळी; अजेंड्याची अंमलबजावणी

ठाण्यात १० रुपयात जेवणाची थाळी; अजेंड्याची अंमलबजावणी

Subscribe

आता ठाण्यात चक्क १० रुपयात जेवण मिळण्यास सुरुवात झाली आहे.

सरकार कधी स्थापन होईल आणि आम्हाला कधी १० रुपयात जेवण मिळेल, या आशेकडे राज्यातील जनता असताना ठाण्यातील काही तरुणांनी १० रुपयात जेवणाचा बेत आखला असून या उपक्रमाची सुरुवात केली आहे. निवडणुकीनंतर १० रुपयांत पोठभर जेवण मिळणार या वचनावरून अनेकांनी हसू आवरत नव्हते. मात्र, आता ठाण्यात चक्क १० रुपयात जेवण मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आश्वासन देणारे सरकार अजून अस्तित्वात नसून देखील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी ही योजना स्वतः सुरू केली असल्याने राजकीय मंडळींना एकप्रकारे चपराक लावली आहे.

कोणत्याही राजकीय श्रेय किंवा फायद्यासाठी ही योजना राबविण्यात आली नसून, आम्ही गेल्या ४ ते ५ महिन्यापासून १० रुपयात थाळी देण्याचे योजिले होते. एक सेवा म्हणजे आम्ही मनापासून काम करत आहोत. कोणताही राजकीय पक्षाची आम्हाला साथ नसून नागरिकांचा उत्तम प्रतिसाद आम्हाला लाभला आहे.
– दिनेश मेहरोल, हॉटेलचे मालक

- Advertisement -

ठाण्याच्या खारटन रोड परिसरात राहणाऱ्या दिनेश मेहरोल आणि सुनिल चेटोले यांनी गोरगरिबांची सेवा म्हणून या उपक्रमात सहभाग घेतला आहे. १० रुपयात भात आणि आमटी असे पौष्ठीक आणि रुचकर जेवण मिळणार असून कष्टकरी आणि कामगार वर्गासाठी एक पर्वणीच ठरली आहे. एककिडे राजकीय पक्षांकडून दहा रुपयांच्या जेवणाची घोषण होत असताना आश्वासन देणाऱ्या सरकारचा अजून पत्ता नसला तरी मात्र, दुसरीकडे १० रुपयात जेवण देण्याचा मान ठाण्याच्या या तरुणांनी मिळवला आहे. त्यामुळे अनेकांनी या उपक्रमाची स्वागत केले असून आश्वासन देणाऱ्या पक्षाने लवकरत लवकर सरकार स्थापन करून १० रुपयात जेवण उपलब्ध करून घ्यावे अशी मागणी या निमित्ताने केली आहे.

योजना चांगली असून आमच्यासारख्या सामान्य नागरिकांना याचा खूप फायदा होत आहे. शहारासारख्या भागात १० रुपयात जेवण मिळते म्हणजे आमचे भाग्यच आहे. बाजारात कष्ट करणाऱ्या हातावर पोट असणाऱ्यांना जेवणाची उत्तम सोय उपलब्ध झाली आहे.
– सुमित साळुंखे, ग्राहक

- Advertisement -

खारटन रोड परिसरात मोठ्या प्रमाणात श्रमिक आणि मध्यम वर्गीय नागरिक आहेत. त्यांना दररोज पौष्ठीक आणि रुचकर जेवण या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. हा व्यवसाय करण्याचा मागचा उद्देश पैसे कमावण्याचा नसून गोरगरिबांना पोठभर जेवण हाच ध्येय आहे.

हेही वाचा –

दिल्लीत संजय राऊत यांनी घेतली शरद पवार यांची भेट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -