आमिरने शेअर केला ‘लाल सिंह चड्ढा’ चा लूक!

लवकरच अभिनेता आमिर खान लाल सिंह चड्ढा या चित्रपटात दिसणार आहे. सध्या आमिर या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. अमिरने सोशलमिडीयावर या चित्रपाटचे पोस्टर शेअर केले आहेत. आमिरने शेअर केलेला त्याचा लूक तुम्हालाही नक्की आवडेल.

View this post on Instagram

Sat Sri Akaal ji, myself Laal…Laal Singh Chaddha.?

A post shared by Aamir Khan (@_aamirkhan) on

लाल सिंह चड्ढामध्ये आमिरचा पंजाबी लूक आहे. या पंजाबी लूकमध्ये देखील चाहत्यांना आवडत आहे. ‘सत श्री अकाल जी ……..लाल सिंह चड्ढा’ असे म्हणत आमिरने त्याचा लूक चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. डोक्यावर पगडी,पिळदार मिशी आणि लांब दाढी असा आमिरचा लूक आहे.

टॉम हँक्सचा ‘फॉरेस्ट गंप (१९९४)’ चा ऑफिशिअल रिमेक ‘लाल सिंह चड्ढा (Lal Singh Chaddha)’ या चित्रपटाला अतुल कुलकर्णीने लिहिले आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती व्हायकॉम १८ स्टुडिओ आणि आमिर खान प्रोडक्शन्स करत आहेत. पुढच्या वर्षी २०२० च्या ख्रिसमसच्या निमित्ताने हा चित्रपट प्रदर्शित होईल. या चित्रपटात करीना कपूर खान मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे.