घरमुंबईवांद्रे-खारमधील जलवाहिनी लगतच्या बांधकामांवर कारवाई

वांद्रे-खारमधील जलवाहिनी लगतच्या बांधकामांवर कारवाई

Subscribe

यावेळी तब्बल ११० बांधकामं हटवण्यात आली आहेत. त्यामुळे जलवाहिनीलगतचा ५०० मीटरचा परिसर मोकळा करण्यात आला असून हा भाग जलअभियंता विभागाकडे सोपवण्यात आला आहे.

वांद्रे-खार पूर्व परिसरातील तानसा पाईपलाईनलगतची अनधिकृत बांधकामं तसेच अतिक्रमणांवर महापालिकेच्यावतीने धडक कारवाई करण्यात आली. यावेळी तब्बल ११० बांधकामं हटवण्यात आली आहेत. त्यामुळे जलवाहिनीलगतचा ५०० मीटरचा परिसर मोकळा करण्यात आला असून हा भाग जलअभियंता विभागाकडे सोपवण्यात आला आहे. मोकळ्या झालेल्या या भागावर पुन्हा अतिक्रमण होवू नये, यासाठी त्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याची कार्यवाही सुरु करण्यात आल्याची माहिती ‘एच पूर्व’ विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांनी दिली आहे.

- Advertisement -

महापालिकेद्वारे टप्पेनिहाय धडक कारवाई करण्यात येत आहे. या अंतर्गत नुकत्याच सलग ५ दिवस वांद्रे ते खार पूर्व परिसरातील एच पूर्व विभाग कार्यालयाच्यावतीने करण्यात आलेल्या एका मोठ्या कारवाई दरम्यान सुमारे ११० अनधिकृत बांधकामं तसेच अतिक्रमणं हटविण्यात आली आहेत. यामुळे ‘एच पूर्व’ विभागातील तानसा पाईपलाईन लगतचा ५०० मीटर लांबीचा भाग मोकळा झाला आहे. मोकळ्या झालेल्या या भागावर पुन्हा अतिक्रमण होवू नये, यासाठी त्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याची कार्यवाही सुरु करण्यात आल्याची माहिती ‘एच पूर्व’ विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांनी दिली आहे.

- Advertisement -

महापालिकेच्या ‘एच पूर्व’ विभागातील विविध खात्यांच्या समन्वयाने तानसा पाईपलाईन लगतची अनधिकृत बांधकामं/अतिक्रमणं हटवण्याच्या या कारवाईसाठी मुंबई पोलीस दलाच्या अखत्यारितील १०० पोलीस कर्मचार्‍यांची एक विशेष तुकडी सदर ठिकाणी तैनात होती. त्याचबरोबर महापालिकेचे १०० कामगार, कर्मचारी, अधिकारी या कारवाईसाठी कार्यरत होते. या व्यतिरिक्त ४ जेसीबी, ५ डंपर आणि अतिक्रमण निर्मूलन विषयक आवश्यक त्या साधनांचा वापर करत ही कारवाई करण्यात आल्याचे अशोक खैरनार यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -