घरमुंबईमेट्रोसाठी जलवाहिनी वळविणार

मेट्रोसाठी जलवाहिनी वळविणार

Subscribe

एमएमआरडीए देणार महापालिकेला ६५ कोटी

मुंबई आणि उपनगरात सध्या मेट्रोचे काम सुरु आहे. या कामाच्या दरम्यान मुंबईसह उपनगरात अनेक ठिकाणी जलवाहिनी फुटण्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे एमएमआरडीए प्रशासनाला त्याचा आर्थिक फटका बसला आहे. मेट्रोच्या कामांमुळे बाधित होणार्‍या जलवाहिनी वळविण्यासाठी आणि दुरस्तीसाठी एमएमआरडीए मुंबई महानगरपालिकेला सुमारे ६५ कोटी २० लाख रुपये देणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी सुरु असलेल्या मेट्रोच्या कामा दरम्यान जलवाहिनी फुटण्याच्या घटना समोर आल्या आहेत. याचा फटका मेट्रो २ अ प्रकल्पाच्या आड येणार्‍या जलवाहिनीसाठी हा खर्च एमएमआरडीएला सोसावा लागणार आहे. पश्चिम उपनगरातील बोरिवली पश्चिम येथील लिंक रोड महावीर नगर जंक्शन ते देवकी नगर जंक्शन ते डी मार्ट कांदरपाडापर्यंत लिंक रोडवरील ९०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी वळवण्यात येणार आहे. ही जलवाहिनी मेट्रो २ अ मार्गाच्या खांबाखालून जाते. त्यामुळे ती अन्यत्र वळवणे गरजेचे आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी एमएआरडीए प्रशासन आणि मुंबई महापालिका प्रशासनाची नुकतीच एक बैठक पार पडली होती. या बैठकीत ही जलवाहिनी वळविण्यासंदर्भात निर्णय झाला आहे. त्यानुसार एमएमआरडीए प्रशासन मुंबई महापालिकेला निधी देणार असून त्यासाठीचे पत्र देखील प्रशासनाला दिले आहे.

- Advertisement -

या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी ६५ कोटी २० लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार महापालिकेने निविदा मागवली असून त्यासाठी एकूण पाच कंत्राटदारांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला आहे. त्यापैकी मे.आर.ए.घुले या कंपनीने वजा ७.४५ टक्के कमी दराने निविदा भरली असून या कंपनीची शिफारस महापालिकेकडून करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -