घरमुंबईडोंबिवली, कल्याणात भटक्या कुत्रांची दहशत

डोंबिवली, कल्याणात भटक्या कुत्रांची दहशत

Subscribe

कल्याण डोंबिवली शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आयरे गावात एका महिलेला भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याची घटना दुसर्‍यांदा घडली आहे. कुत्र्यांच्या दहशतीमुळे आयरेवासीय भयभित झाले आहेत. काही दिवसांपूर्वी स्थायी समितीच्या सभेत नगरसेविकांनी भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, अजूनही प्रशासनाकडून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात आला नसल्याने कल्याण, डोंबिवलीकर भटक्या कुत्र्यांंच्या दहशतीखाली आहेत.

डोंबिवली पूर्वेतील आयरे रोड परिसरात राहणार्‍या अमृता कांबळे या कामावर रस्त्याने पायी जात असतानाच, अचानक रस्त्यावरील भटका कुत्रा त्यांच्या अंगावर आला. त्या कुत्र्याने त्यांच्या पायाला चावा घेतला आहे. मात्र, हा कुत्रा दुसर्‍यांदा त्यांना चावला आहे. भटक्या कुत्र्याने अनेकांना चावा घेतला असून, इथल्या रहिवाशांनी यांसदर्भात पालिकेत तक्रार केली आहे. पालिकेने या कुत्र्याला पकडून नेले होते. मात्र, तो पुन्हा आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

- Advertisement -

लहान मुले, वयोवृध्द नागरिक महिलांच्या अंगावर हे कुत्रे धावून येत असल्याने नागरिक भयभित झाले आहेत. तसेच कुत्र्यांचे निर्बिजीकरण करून पुन्हा त्याच ठिकाणी आणून सोडण्यात येत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. शहरात दररोज 30 ते 40 जणांना श्वानांच्या दहशतीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या सहा वर्षात तब्बल 63 हजार 262 जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची अधिकृत आकडेवारीही गेल्या महिन्यात पालिकेने जाहीर केली आहे. अ‍ॅन्टी रेबीज इंजेक्शनवर पालिकेकडून 2 कोटी 73 लाख खर्च करण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -