घरक्रीडास्टारफिश स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या जलतरणपटूंची चमकदार कामगिरी

स्टारफिश स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या जलतरणपटूंची चमकदार कामगिरी

Subscribe

नुकत्याच गोवा येथे झालेल्या गोवा स्विमथॉन सागरी जलतरण स्पर्धेत तसेच सनक्रॉक ते गेटवे ऑफ इंडिया येथे झालेल्या सागरी जलतरण स्पर्धेत ठाण्यातील स्टारफिश स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या जलतरणपटूंनी चमकदार कामगिरी केली. या दोन्ही स्पर्धांमध्ये स्टारफिशच्या जलतरणपटूंनी विविध पदके पटकावली.

गोवा येथे झालेल्या सागरी जलतरण स्पर्धेच्या २५० मीटर प्रकारात शुभम पवार, ऋतुजा पोळ यांनी पहिला, अरीन नरोटे, सोहम साळुंखे, ईशा शिंदे यांनी दुसरा, स्वरा सावंत, सिध्दांत पोल,विजय ओजाळे, प्रशांत साळुंखे, पलक शहा, कैलास आखाडे यांनी तिसरा, मुक्ता काळेने चौथा, अनिष चव्हाणने पाचवा, सई डिंगणकर, कुंज शहा यांनी सहावा, तिजल शहाने आठवा तर अनुज पुजारी, वैष्णवी भोसले यांनी दहावा क्रमांक पटकावला, तर १ किलोमीटर प्रकारात ईशा शिंदे, शुभम पवार यांनी दुसरा, विजय ओजाळे यांनी तिसरा, प्रशांत साळुंखे, स्वरा सावंत यांनी चौथा आणि अनिश पुजारीने दहावा क्रमांक पटकावला. २ किलोमीटर अंतराच्या शर्यतीत अरीन नरोटे याने दुसरा क्रमांक पटकावला. तसेच १० किमी स्पर्धेत शुभम पवार याने चौथा क्रमांक मिळवला.

- Advertisement -

सनक्रॉक ते गेट वे ऑफ इंडिया येथे झालेल्या ५ किमी जलतरण स्पर्धेत पृथ्वीराज कांबळे, सानिका तापकीर यांनी सातवा तर हर्ष पाटील याने दहावा क्रमांक पटकावला. २ किमी स्पर्धेत नील वैद्यचा पाचवा क्रमांक आला. हर्ष संगळगिले, अर्चित सली याने हे अंतर यशस्वीरित्या पूर्ण केले. प्रशिक्षक अतुल पुरंदरे आणि कैलास आखाडे यांच्या प्रशिक्षणाखाली स्टारफिशचे जलतरणपटू सराव करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -