घरमुंबईEknath Shinde : सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा आजचा दिवस; मुख्यमंत्र्यांकडून भावना...

Eknath Shinde : सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा आजचा दिवस; मुख्यमंत्र्यांकडून भावना व्यक्त

Subscribe

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (22 जानेवारी) राम मंदिर लोकार्पण, प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. यानंतर अभिजीत मुहूर्तावर ठरलेल्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वेद विद्वानांनी रामलल्लाच्या प्रतिमेचा अभिषेक विधी पार पाडला. त्यामुळे आज देशात उत्सवाचे वातावरण होते. याचपार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी राम मंदिररात आरतीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मोठ्या प्रमाणावर शोभायात्रा देखील काढण्यात आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील मुंबईत एका रॅलीत सहभागी झाले. यावेळी त्यांनी वक्तव्य केले की, सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा आजचा दिवस आहे. (Eknath Shinde Today should be written in golden letters Sentiments from the Chief Minister)

हेही वाचा – Imam Ilyasi : आपल्या श्रद्धा वेगळ्या असू शकतात, पण आपला सर्वात मोठा धर्म…; इमाम इलियासी यांचे वक्तव्य चर्चेत

- Advertisement -

एकनाथ शिंदे म्हणाले की, अयोध्येमध्ये राम मंदिर सोहळा पार पडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्यासह करोड हिंदूंचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. आज ऐतिहासिक दिवस आहे. सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा हा दिवस आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हे स्वप्न पूर्ण केलं आहे, त्यामुळे मी त्यांना मनापासून धन्यवाद करतो. आज रामाचा 500 वर्षांपासूनचा वनवास संपला आहे आणि रामलल्ला मंदिरामध्ये विराजमान झाले आहेत. हा जल्लोष संपूर्ण देशभरात आहे. संपूर्ण देशभर राममय वातावरण झालेले आहे. फक्त देशात नाही तर देशाबाहेर देखील आज उत्सव साजरा करण्यात आलेला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – Shiv Sena : ‘खऱ्या शिवसेने’वरून पुन्हा राजकीय वातावरण तापणार; ठाकरेंच्या याचिकेवर शिंदे गटाला नोटीस

- Advertisement -

एकनाथ शिंदे म्हणाले की, अनेक वर्ष संघर्ष झाल्यानतंर आज आपण लढाई जिंकलो आहोत आणि मोदींच्या मदतीने त्याठिकाणी मंदिर उभे राहिले आहे. संपूर्ण देशामध्ये आज दिवाळी साजरी होत आहे. आज आनंदाचा दिवस आहे. त्यामुळे आनंद उत्सव साजरा करण्यासाठी सुट्टी देखील जाहीर करण्यात आली होती. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळा हा डोळ्याचं पारन फेडणारा असा संपूर्णपणे कार्यक्रम होता, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -