घरमुंबईएकनाथ शिंदे यांचा विजयी चौकार

एकनाथ शिंदे यांचा विजयी चौकार

Subscribe

कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदार संघावर पुन्हा एकदा शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व स्पष्ट झाले. अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पहिल्या फेरीपासूनच मतांमध्ये आघाडी घेतली होती. त्यांना सण 2014 च्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत 13 हजार 349 मताधिक्य मिळवीत विजय प्राप्त केला आहे. एकनाथ शिंदे यांनी 1 लाख 13 हजार 497 मते मिळवून विजयाचा चौकार लगावला आहे. मागील २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांना 1 लाख 148 मते मिळाली होती.

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे एकतर्फी निकाल लागला असून पुन्हा मतदार संघावर भगवा फडकविला आहे. या मतदार संघात काँग्रेसचे संजय घाडीगावकर आणि मनसेचे महेश कदम यांचे आव्हान शिंदे यांच्या समोर होते. त्यात संजय घाडीगावकर यांनी प्रचारात क्लस्टरचा मुद्दा घेऊन एकनाथ शिंदे यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला होता.

- Advertisement -

मात्र, तो प्रयत्न सपशेल अपयशी ठरला. उलट यंदाच्या वर्षी शिंदे यांनी सन 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या तुलनेत 13 हजार 349 अधिकचे मताधिक्य मिळवले आहे. एकनाथ शिंदे यांना 1 लाख 13 हजार 497 मते मिळाली आहे. तर, काँग्रेसचे संजय घाडीगांवकर यांना 24 हजार 197 मते मिळाली, मनसेचे महेश कदम यांनी देखील त्यांच्यापाठोपाठ 21 हजार 513 मते मिळवित पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातील मतदारांना जाहीर धन्यावाद देतो. या मतदारसंघातील मतदारांशी राजकारणा पलिकडेचे नाते निर्माण झाले असल्यामुळे त्यांनी मतदानातून त्यांचे प्रेम व्यक्त केले आहे. तसेच या मतदार संघातील समस्या व प्रश्न सोडविल्यामुळे त्या कामाची पोच पावती या निकालातून दिसून येत आहे. जनतेचे पुन्हा एकदा आभार.
– एकनाथ शिंदे, विजयी उमेदवार, शिवसेना.

- Advertisement -

जनतेने दिलेला कौल मला मान्य आहे. तसेच काँग्रेसच्या माध्यमातून ठाणे शहराला व ठाणेकर नागरिकांना ज्या गोष्टी आवश्यक आहेत. त्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन.
– संजय घाडीगांवकर, पराभूत उमेदवार, काँग्रेस.

एकनाथ शिंदे शिवसेना 1 लाख 13 हजार 497 (विजयी)
संजय घाडीगांवकर काँग्रेस 24 हजार 197
महेश कदम मनसे 21 हजार 513
उन्मेश बागवे वंचित बहुजन आघाडी 5 हजार 925

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -