घरमुंबईसार्वजनिक गणेशोत्सवासाठी बेस्टकडून अखंडित वीजपुरवठा

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी बेस्टकडून अखंडित वीजपुरवठा

Subscribe

मुंबई – बेस्ट उपक्रमाने सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सवासाठी अखंडित वीज पुरवठा, विद्युत रोषणाईसाठी ‘एक खडकी’ योजनेद्वारे परवानगी, गणेश विसर्जन स्थळी प्रखर दिवे, अन्य दिव्यांची सुविधा असे विविध ‘ बेस्ट’ उपक्रम राबवत आहे.

त्यामुळे गणेशोत्सव मंडळे व शहर विभागातील बेस्टच्या वीज ग्राहकांना गणेशोत्सवात मोठा दिलासा मिळणार आहे. मागील दोन वर्षांपासून मुंबईत कोरोना महामारीमुळे काळात सण, उत्सव व सर्व सार्वजनिक उपक्रमावर निर्बंध होते. मात्र, राज्य सरकारने सण व उत्सव जल्लोषात साजरे करण्यासाठी सर्व निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे यंदा गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, मुंबईतील गणेशोत्सवाबाबतचा मुंबईकरांचा उत्साह पाहता गणेशोत्सव मंडळे, गणेशभक्त आणि मुंबईकरांच्या सोयीकरीता बेस्ट उपक्रमाने गणेशोत्सवातील विद्युत रोषणाईसाठी तात्पुरता वीज पुरवठा विनाविलंब मिळविण्याकरीता बेस्टच्या संबंधित ग्राहकसेवा विभागात एक खिडकी योजना कार्यान्वित केली आहे, अशी माहिती बेस्ट उपक्रमाने दिली आहे.

- Advertisement -

बेस्टच्या मार्गप्रकाश विभागाने मिरवणूक मार्गावरील व विसर्जनस्थळावरील प्रकाश योजनेची सुरक्षतेच्या दृष्टीने आखणी केलेली आहे. बेस्ट उपक्रमाने गणेशभक्तासाठी ७१ मिरवणूक मार्ग २० विसर्जन स्थळे आणि ३८ कुत्रिम तलाव येथे २२१५ दिवे लावून प्रकाश योजना केली आहे. विसर्जन स्थळांवर सुयोग्य प्रकाश व्यवस्थेकरीता एकूण १३ स्थायी विद्युत मनोऱ्यांची उभारणी केली आहे. तसेच मोठ्या गर्दीच्या ठिकाणी आपतकालीन परिस्थितीत विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विसर्जन स्थळांवर पर्यायी वीज पुरवठ्याकरीता एकूण ८ डिझेल जनित्र संचांची व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच, समुद्र चौपाटीसारख्या विसर्जन स्थळी गणेशमूर्तीचे विसर्जन करताना आपत्कालीन प्रसंग उद्भवल्यास समुद्रात बुडणा-या व्यक्तींना तात्काळ मदत देऊन वाचविण्यासाठी जीवरक्षक दलाला बचावकार्यात मदत म्हणून समुद्रात खोलवर प्रकाश पोहोचण्यासाठी एकूण १९ उच्च क्षमतेचे झोत असलेले शोधप्रकाश (सर्च लाईट ) दिव्यांची व्यवस्था केलेली आहे.
त्याचप्रमाणे, विसर्जन स्थळांवर वीज पुरवठा सुरळीत व विनाखंडीत चालू ठेवण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांची नेमणूक केलेली आहे.

मुंबई शहर हद्दीत साजरा करण्यात येणा-या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या धर्तीवर दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तसेच मुंबईकरांच्या माहितीसाठी बेस्ट उपक्रमाच्या मार्गप्रकाश विभागमार्फत एक माहिती पुस्तिका २५ ऑगस्ट २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आली आहे. विद्युत रोषणाईसाठी तात्पुरता वीज पुरवठा मिळवण्यासाठी अर्जदाराने पूर्ण करावयाच्या नियम व अटींच्या सर्व सुचना तसेच बेस्टच्या मार्गप्रकाश विभागाने मिरवणूक मार्गावरील व विसर्जनस्थळावरील प्रकाश योजनेच माहिती तसेच गणेश भक्तांसाठीची बस वाहतूक व्यवस्था यासंदर्भात संपूर्ण माहिती माहितीपुस्तिकेत विस्तृतपणे देण्यात आलेली आहे. सदर पुस्तिका बेस्ट उपक्रमाच्या www.bestundertaking.com च्या वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे, असे बेस्ट उपक्रमाने कळवले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -