घरमुंबईपूलांच्या सल्लागारांना मुदतवाढ

पूलांच्या सल्लागारांना मुदतवाढ

Subscribe

दोन महिन्यांपूर्वी कंत्राट संपूनही नवीन सल्लागारांची निवड नाही

मुंबईतील पूल आणि उड्डाणपूलांसह भुयारी मार्गाच्या बांधकामांसााठी नेमण्यात आलेल्या सल्लागारांचा कंत्राट कालावधी ऑगस्ट महिन्यात संपुष्ठात आल्यानंतरही नवीन सल्लागारांची निवड होईपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या सल्लागारांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील रेल्वे पादचारी पूलाची देखभाल करणार्‍या डि.डि.देसाई असोशिएट्स इंजिनिअरींग कन्सल्टंट अँड ऍनालिस्ट्रप्रा.लिमिटेड या ही काळ्या यादीतील कंपनी वगळता अन्य सर्व कंपन्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुंबईतील पूल, उड्डाणपूल,भुयारी मार्ग, पादचारी पूल इत्यादींच्या बांधकामांसाठी सल्लागार सेवेसाठी व त्यांची फेरतपासणी करण्यासाठी नियुक्त सल्लागारांची नेमणूक पुढे चालू ठेवण्याबाबत आठ सल्लागारांची नियुक्ती २४ जुलै २०१६ रोजी केली होती. स्थायी समितीच्या मान्यतेने तीन वर्षांसाठी त्यांची निवड केली होती. यासर्व सल्लागारांचा कंत्राट कालावधी २३ ऑगस्ट२०१९ला संपुष्ठात आला. १४ मार्च २०१९ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील हिमालय पूलाच्या दुघर्टनेला जबाबदार असलेल्या शहर भागातील पूलांचे स्ट्क्चरल ऑडीट करणार्‍या डी.डी.देसाई असोशिएट्स यांच्यावर कायदेशीवर कारवाई चालू असल्याने त्यांचे नाव सल्लागार मंडळातून वगळण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी शहर भागातील पूलांचे स्थितीदर्शक सर्वेक्षण करण्यासाठी नवीन तांत्रिक सल्लागार म्हणून स्ट्क्चरल डिझाईनर्स अँड कन्सल्टंट प्रा.लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे.

- Advertisement -

हिमालय पूल दुघर्टनेबाबत नियुक्ती सल्लागार समितीच्या सूचना व निर्देश यांचा समावेश नवीन तांत्रिक सल्लागार मंडळ नियुक्ती करण्याच्या निविदा मसुद्याचे काम सुरु आहे. त्यामुळे याला विलंब लागण्याची शक्यता लक्षात घेता शिफारस केलेल्या प्रकल्पांकरता यामुळे कामावर तांत्रिक सल्लागार मिळवणे आवश्यक असल्याचे पूल विभागाच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

मुदतवाढ दिलेल्या सल्लागारांची नावे
टीपीएफ इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेड(एस.एन.भोबे अँड असो.)
टेक्नोजेम कन्सल्टंट प्रा.लि.
स्पेक्ट्न टेक्नो कन्सल्टंट प्रा.लि.
स्ट्क्टकॉन डिझाईन प्रा.लि.
श्रीखंडे कन्सल्टंट प्रा.लि.
कन्सट्ु्रमा कन्सल्टंट प्रा.लि.
कंपोसीट कंबाईन टेक्नोक्रॉफ्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -