घरमुंबईअखेर 'त्या' जातपंचायतच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

अखेर ‘त्या’ जातपंचायतच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Subscribe

कौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या तरुणाच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकणाऱ्या कंजारभाट जातपंचायतच्या सरपंचासह ४ जणांविरुद्ध अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या तरुणाच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकणाऱ्या कंजारभाट जातपंचायतच्या सरपंचासह ४ जणांविरुद्ध अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबरनाथ (प.) येथे वांद्रापाडा परिसरात राहणाऱ्या रोमलाबाई सतंयसिंग तमायचिकर या कंजारभाट समाजातील वृद्ध महिलेचे सोमवारी निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्कारात समाजातील लोकांनी, नातेवाईकांनी सामील होऊ नये, असे फर्मान कंजारभाट जातपंचायतचे सरपंच संगम गारुंगे यांनी काढले होते.

काय होता फर्मान

संगम गारुंगे, भूषण गारुंगे, करण गारुंगे अविनाश गाडगे या आरोपींनी सोशल मीडियाचा आणि फोनचा वापर करून रोमलाबाई यांच्या अंत्यसंस्कारात कोणी जाऊ नये, जो कोणी या अंत्यसंस्काराला जाईल त्यांच्या कुटुंबावर देखील बहिष्कार टाकला जाईल, अशी धमकी दिली. विजय तमायचिकर याने समाजातील प्रथेला विरोध करून संपूर्ण भारतात समाजाची नाचक्की केली आहे. त्यामुळे त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे, असे प्रक्षोभक वक्तव्य आरोपींनी सोशल मीडियावर व्हायरल केले होते.

- Advertisement -

सर्व आरोपी फरार 

या प्रकरणी विजय तमायचिकर यांनी काल रात्री अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी संगम गारुंगे, भूषण गारुंगे, करण गारुंगे, अविनाश गाडगे यांच्याविरुद्ध तक्रार केली असता पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध सामाजिक बहिष्कार प्रतिबंध व निवारण अधिनियम २०१६ मधील जनतेचे महाराष्ट्र संरक्षण अधिनियम ३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -