घरमनोरंजनR. Madhavan : अभिनेता आर. माधवनने नाकारले हे ब्लॉकबस्टर चित्रपट

R. Madhavan : अभिनेता आर. माधवनने नाकारले हे ब्लॉकबस्टर चित्रपट

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आर. माधवन आणि ज्योतिका यांचा ‘शैतान’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
हा सिनेमा प्रदर्शित झाला असून रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने बंपर कमाई केली आहे. सिनेमात आर.माधवन मात्र भाव खाऊन गेलाय. अजय देवगण जरी या चित्रपटाचा हिरो असला तरी चित्रपट पाहून झाल्यानंतर लक्षात फक्त आर.माधवनचा परफॉर्मन्स राहतो. सिनेमातील आर. माधवनचा “अहं ब्रह्मास्मि” डायलॉग तर प्रेक्षकांच्या टाळ्या-शिट्या घेतो. पण जर आर माधवनच्या चित्रपटांवर नजर टाकली तर असे अनेक वेळा घडले आहे जेव्हा त्याने चित्रपट नाकारले आहेत जे नंतर सुपरहिट ठरले. कोणते आहेत हे चित्रपट पाहुयात.

काखा काखा (2003)

आर माधवनच्या नाकारलेल्या चित्रपटांच्या यादीत पहिले नाव आहे ‘काखा काखा’. हा सिनेमा 2003 मध्ये रिलीज झाला होता.एका वृत्तानुसार, गौतम  वासुदेव मेनन यांनी या चित्रपटासाठी माधवनशी संपर्क साधला होता. पण काही कारणास्तव त्याने तो चित्रपट करण्यास नकार दिला.

- Advertisement -

गजनी (2005)

2005 मध्ये दिग्दर्शक ए आर मुरुगदास यांनी ‘गजनी’ हा चित्रपट आणला,  या चित्रपटाचा मुख्य अभिनेता सूर्या होता, ज्याने संजय राजास्वामीच्या भूमिकेत प्रेक्षकांची मने जिंकली होती. हा चित्रपट माधवनला सूर्यापूर्वी ऑफर करण्यात आला होता. पण त्याला चित्रपटाचा दुसरा भाग आवडला नाही. या कारणास्तव त्याने त्याची स्क्रिप्ट नाकारली. पुढे हा साऊथ चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाचा हिंदी रिमेकही बनवण्यात आला होता, ज्याचा मुख्य अभिनेता आमिर खान होता.

माय नेम इज खान (2010)

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने आपल्या करिअरमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. यापैकी एक म्हणजे ‘माय नेम इज खान’. आर माधवनला ‘माय नेम इज खान’ ऑफर करण्यात आल्याचा दावा अनेक रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. पण त्यावेळी तो राजकुमार हिरानीच्या ‘3 इडियट्स’च्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. वेळेअभावी त्याला ‘माय नेम इज खान’ चित्रपटाला नाही म्हणावं लागलं.

- Advertisement -

फन्ने खां (2018)

आर माधवनलाही ऐश्वर्या आणि राजकुमार रावच्या ‘फन्ने खां’ चित्रपटाचा भाग बनण्याची संधी मिळाली. पण त्याच्या शेड्युलमुळे तो या पिक्चरचा भाग होऊ शकला नाही. एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की, मला चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली आहे. पण तारखांअभावी मी चित्रपट करू शकलो नाही. 2018 मध्ये ‘फन्ने खां’ रिलीज झाला होता, ज्यामध्ये ऐश्वर्या आणि राजकुमार यांच्याशिवाय अनिल कपूरनेही महत्त्वाची भूमिका साकारली होती.

आर. माधवन (R Madhavan) हा भारतीय चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक आहे. तो अभिनयासह लेखन, दिग्दर्शन देखील करतो. आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल में, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -