घरमुंबईरेल्वे रोको करणार्‍या ५०० आंदोलकांवर गुन्हे दाखल

रेल्वे रोको करणार्‍या ५०० आंदोलकांवर गुन्हे दाखल

Subscribe

पुलवामा दहशतवादी हल्लाप्रकरण

वसई , पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ नालासोपार्‍यात रेल्वे रोको करणार्‍या ५०० आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जम्मू काश्मिरमध्ये १४ फेब्रुवारी रोजी जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्याने केलेल्या भ्याड हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याच्या देशभर संतप्त प्रतिक्रीया उमटत असतानाच नालासोपार्‍यात सर्वपक्षीयांनी पुकारलेल्या नालासोपारा बंदला मात्र हिंसक वळण लागले होते. काही ठिकाणी तोडफोडीच्या घटना घडण्याबरोबरच नालासोपारा रेल्वेस्थानकात आंदोलकांनी हजारोंच्या संख्येने उतरून रेल्वेरोको केला होता. तब्बल ८ दिवसांनंतर या रेल्वेरोको आंदोलनाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून आंदोलनकर्त्या ५०० जणांवर पोलिसांनी कारवाईचा दंडुका उगारला आहे. वसई रेल्वे पोलीस ठाण्यात ५०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हल्ल्याच्या निषेधार्थ सर्वत्र आंदोलने होत असताना नालासोपारा रेल्वे स्थानकात नागरिकांनी मात्र उग्र आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यामुळे रेल्वेच्या आरपीएफ जवानांना लाठीचार्ज करून आंदोलनकर्त्यांना पळवून लावावे लागले. आंदोलनाच्या दिवशी नागरिकांनी सकाळी साडेआठ वाजता रेल्वेस्थानकात जमा होत हल्ल्याचा निषेध केला हा निषेध एक वाजेपर्यंत सुरूच होता. नागरिक हटायला तयार नसल्याने आरपीएफ जवानांना लाठीचार्जचा पर्याय अवलंबावा लागला होता. आंदोलकांनी पाच तास रेल रोको आंदोलन केले. यावेळी लोकल ट्रेनवर दगडफेक करण्यात आली, तसेच आंदोलकांच्या हल्ल्यात पाच पोलीस अधिकारी आणि कर्मचारीदेखील जखमी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -