घरताज्या घडामोडीसाकीविहार येथे इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये आग

साकीविहार येथे इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये आग

Subscribe

अंधेरी (पूर्व), साकीविहार येथील दुमजली अन्सा इंडस्ट्रीयल इस्टेटमधील सी विंगमध्ये, तळमजल्याला शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली.

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ( पूर्व), साकीविहार येथील अन्सा इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. (Fire in Industrial Estate at Saki Vihar)

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी (पूर्व), साकीविहार येथील दुमजली अन्सा इंडस्ट्रीयल इस्टेटमधील सी विंगमध्ये, तळमजल्याला शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक उपकरणे, लाकडी फर्निचर यांमुळे आग भडकली.

- Advertisement -

या आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन युद्धपातळीवर आग विझविण्याचे काम हाती घेतले. मात्र ज्वलनशील वस्तूंमुळे ही आग भडकली होती. अग्निशमन दलाने तीन फायर इंजिन, दोन जंबो वॉटर टॅंकर यांच्या साहाय्याने या आगीवर रात्री उशिराने नियंत्रण मिळविले. मात्र, ही इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये आग का व कशी काय लागली, याबाबत स्थानिक पोलीस, पालिका यंत्रणा व संबंधित अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान अधिक तपास करीत आहे.


हेही वाचा – कॅलिफोर्नियामध्ये जातिभेद निर्मूलन विधेयक मंजूर; अमेरिकेतील व्यावसायिक, मंदिरांचा विरोध

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -