घरमुंबईपालकांच्या त्रासाला वैतागून पळालेली ५ मुले २४ तासात ताब्यात

पालकांच्या त्रासाला वैतागून पळालेली ५ मुले २४ तासात ताब्यात

Subscribe

रबाळे येथील एकाच परिसरातील पाच अल्पवयीन मुले बुधवारी दुपारी कोणालाही न सांगता घरातून पळून गेल्यामुळे या परिसरात खळबळ उडाली होती.

रबाळे येथील एकाच परिसरातील पाच अल्पवयीन मुले बुधवारी दुपारी कोणालाही न सांगता घरातून पळून गेल्यामुळे या परिसरात खळबळ उडाली होती. पालक मुलांचा शोध घेत होती. रात्री उशीरापर्यंत मुले घरी आली नाहीत म्हणून पालकांनी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी या मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. नवी मुंबई, मुंबई, ठाणे येथील पोलीस स्टेशन, बालसुधार गृह, आरपीएफ, एसआरपीएफ, एनजीओ अशा ठिकाणी मुले बेपत्ता झाल्याचे कळवण्यात आले. अखेर ही अल्पवयीन मुले सीएसएमटी रेल्वे स्थानकात आढळून आली.

रबाळे येथील कातकरी पाडामध्ये राहत असणार्‍या पाच अल्पवयीन मुलांना अभ्यासाची आवड नसल्यामुळे ते शाळेत जात नव्हते. या मुलांचे पालक शाळेत जाण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी मुलांवर सक्ती करत होते. या मुलांचे आईवडिल दोघेही कामावर जात असल्यामुळे ही मुले दिवसभर उनाडक्या करायची. रेल्वेतून फुकट फिरायची.

- Advertisement -

मैदानातून बेपत्ता
बुधवारी दुपारी शाळा सुटल्यांनतर ती मैदानात खेळत होती. मात्र अचानक ही मुले बेपत्ता झाली. या मुलांच्या पालकांचा रबाळे येथील तलाव, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी शोध घेतला. रात्री उशीरापर्यंत मुले न आढळल्याने अखेर गुरुवारी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सीएसएमटीला सापडली
पोलीसांनी या मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. गुरुवारी ही मुले सकाळी ८ च्या सुमारास रेल्वेमध्ये दिसल्याचे एकाने पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी पनवेल, वाशी सर्वच ठिकाणच्या रेल्वे स्थानकांची पाहणी केली होती. पण ही मुले आढळून आली नाहीत. त्यामुळे रबाळे एमआयडीसी पोलीसांनी एसआरपीएफ, एनजीओ,आपीएफ, बालसुधारगृह अशा ठिकाणी मुले बेपत्ता झाल्याची माहिती दिली. गुुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एका स्वयंसेवी संस्थेला ही मुले सीएसएमटी रेल्वे स्थानकात आढळून आली. रबाळे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन भिंगारदिवे यांनी या मुलांना ताब्यात घेतले. या मुलांना कोर्टात हजर करुन पालकांच्या ताब्यात देणार असल्याचे पोलीसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -