घरमुंबईकेडीएमसीच्या ई टेंडरींग प्रक्रियेत फिक्सींग

केडीएमसीच्या ई टेंडरींग प्रक्रियेत फिक्सींग

Subscribe

7 वर्षात 2500 कोटींच्या भ्रष्टचाराचा आरोप

कल्याण डोंबिवली महापालिकेतील घोटाळे आणि भ्रष्टाचार अनेकवेळा चव्हाट्यावर आले आहेत. मात्र पालिकेच्या ई टेंडरींग निविदा प्रक्रियेत फिक्सींग करून भ्रष्टचार केल्याचा आरोप वजा तक्रार शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक व माजी स्थायी समितीचे सभापती वामन म्हात्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केला आहे. सन 2011 ते 2018 या काळात महापालिकेला अंदाजे अडीच हजार कोटीचा तोटा सहन करावा लागल्याचा आरोपही त्यांनी निवेदनात केला आहे.  सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकानेच भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केल्याने पालिकेत खळबळ उडाली आहे.

महापालिकेत सन 2011 पासून ई निविदा प्रक्रिया सुरू केलेली आहे. मात्र महापालिकेतील कुठल्याही कामाच्या निविदा वृत्तपत्रात प्रसिध्द झाल्यानंतर त्या विभागातील काम करणार्‍या  ठेकेदाराला अधिकार्‍यांकडून बोलावले जाते. त्यांची गोपनीय बैठक घेतली जाते. त्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर कुठले काम कोणी घ्यायचे याची वाटणी केली जाते. एका ठेकेदाराला दोन ठेेकेदार हे सपोर्टींग म्हणून निविदा भरण्यासाठी तयार केले जातात. जेणेकरून स्पर्धा झाल्याचे भासवले जाते. तसेच ज्या ठेकेदाराला तीन निविदा मिळणार आहेत. त्याची रक्कम देखील त्याच ठिकाणी भरली जाते. तसेच निविदाही 10 टक्के 15 टक्के जास्त दराने येतात.

- Advertisement -

निविदा फिक्सींग आणि सिंडीकेट करून महापालिकेला लुटले जात असल्याचा आरोप म्हात्रे यांनी निवेदनात केला आहे. 2011 ते 2018 पर्यंतच्या कालावधीतील  ज्या निविदा प्रसिध्द झाल्या त्यांची टिप्पणी आणि कार्यादेश यांचे विशेष लेखापरिक्षण करून अहवाल मागवावा किंवा या संपूर्ण प्रकरणाची अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडून  चौकशी करावी, अशी मागणी नगरसेवक म्हात्रे यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -