घरमुंबईजे. जे. रुग्णालयातून पळून गेलेल्या महिलेस अटक

जे. जे. रुग्णालयातून पळून गेलेल्या महिलेस अटक

Subscribe

जे. जे. रुग्णालयातून पळून गेलेल्या एका 40 वर्षांच्या महिलेस मंगळवारी गोवंडी परिसरातून जे. जे. मार्ग पोलिसांनी अटक केली. शबीना अन्सारी असे या महिलेचे नाव असून तिची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे एसीपी अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले.

गेल्या वर्षी शबीनाविरुद्ध काशिमिरा पोलिसांनी एक गुन्हा दाखल केला होता. एका अल्पपयीन मुलीचे अपहरण करुन तिला वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याचा तिच्यावर आरोप होता. याच गुन्ह्यात नंतर तिला पोलिसांनी अटक केली होती. सध्या ती न्यायालयीन कोठडीत कारागृहात होती. शनिवारी 9 फेब्रुवारीला तिला मेडीकलसाठी पोलीस पथक जे. जे. रुग्णालयात घेऊन आले होते. पहाटे पाच वाजता ती रुग्णालयातून पोलिसांना चकमा देऊन पळून गेली होती.

- Advertisement -

हा प्रकार बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी तिच्याविरुद्ध कायदेशीर रखवालीतून पलायन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच एसीपी अविनाश धर्माधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष गायकवाड यांच्या पथकाने तिचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना शबीना ही गोवंडी परिसरात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस उपनिरीक्षक घेवडेकर व अन्य पोलीस पथकाने तिला गोवंडी येथून अटक केली. सध्या ती पोलिसांच्या कोठडीत असून तिची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -