घरमुंबईदिव्यांग मुलांसाठी नवी मुंबईत देशातील पहिले मैदान

दिव्यांग मुलांसाठी नवी मुंबईत देशातील पहिले मैदान

Subscribe

वाशी सेक्टर ३० येथे दिव्यांग मुलांसाठी खास अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्र उभारण्यात आल्यानंतर आता सानपाडा जुईनगर सेक्टर १० येथे सहा एकरवर अपंग व विशेष विद्यार्थ्यांसाठी आगळेवेगळे उद्यान विकसित करण्यात येत आहे. यासाठी एकूण ७ कोटी रुपये खर्च करण्याची तयारी पालिकेने ठेवली असून अशा प्रकारचे हे देशातील पहिले उद्यान असणार आहे. या उद्यानाचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच ते दिव्यांग मुलांसाठी खुले करण्यात येईल, अशी अपेक्षा पालिका डॉ. रामास्वामी एन यांनी व्यक्त केली आहे.

नवी मुंबई पालिकेने वाशी सेक्टर ३० येथे या मुलांसाठी खास अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवा सुविधा केंद्र उभारलेले आहे. पालिकेने केलेल्या या कामाचा गौरव केंद्र तसेच राज्य सरकारकडून करण्यात आलेला आहे. भारतीय गुणवत्ता परिषदेने या केंद्राला ‘अ’ प्रमाणपत्र दिले आहे. अंपगांना समान संधी, संरक्षण आणि सहभाग राहावा यासाठी पालिकेने अनेक सुविधा एकाच छताखाली उभारलेल्या आहेत. आता या विद्यार्थ्यांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी एक विशेष उद्यानाची उभारणी सानपाडा जुईनगर सेक्टर १० येथील उद्यानाच्या मोकळ्या जागेत करण्यात येत आहे.

- Advertisement -

या विशेष मुलांना केवळ स्पर्शाने खेळाचे साहित्य, फळे, फुलांचे आकलन होईल असे सेन्सर या उद्यानात ठेवले जाणार असून त्यासाठी दोन सल्लागार नेमण्यात आलेले आहेत. यासाठी पालिका सात कोटी रुपये खर्च करणार असून पुढील वर्षी या उद्यानाच्या विकासाला सुरुवात केली जाणार आहे. अपंगांसाठी उभारण्यात येणारे हे देशातील विशेष उद्यान राहणार आहे.

पालिकेचे ‘ईटीसी’ केंद्र हे देशात लक्षवेधी असून राज्य व केंद्र सरकारकडून त्याची दखल घेतली गेली आहे. या मुलांनाही समान संधी देण्याचा पालिकेचा प्रयत्न राहिला आहे. शहरातील नागरिकांसाठी २०० पेक्षा जास्त उद्याने आहेत. या मुलांसाठी आधुनिक असे विशेष उद्यान विकसित करण्यात येत असून हा देशातील पाहिला प्रयोग आहे.
– डॉ.रामास्वामी एन., आयुक्त, नवी मुंबई पालिका.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -