घरमुंबई१८ वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांवर पालिका रुग्णालयांत मोफत उपचार

१८ वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांवर पालिका रुग्णालयांत मोफत उपचार

Subscribe

केंद्र सरकारच्या 'राष्ट्रीय बाल स्वास्थ्य' कार्यक्रमांतर्गत आता १८ वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांवर पालिका रुग्णालयांत मोफत उपचार घेता येणार आहे.

केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य’ कार्यक्रमांतर्गत पालिका शाळांतील ६ वयोगटावरील १८ वर्षापर्यंतच्या मुलांना पालिका रुग्णालयांत मोफत आरोग्यसेवेचा लाभ घेता येणार आहे. आता ० ते ६ वयोगटापर्यंतच्या अंगणवाडी आणि बालवाडीतील मुलांनाही या मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेता येणार आहे. तसा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीने मंजूर केला आहे. त्यासाठी पालिका १३ कोटी रुपये खर्च करणार आहे.

पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना घेता येणार लाभ

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम महाराष्ट्रासह देशभरात २०१३ पासून राबविण्यात येत आहे. मात्र, मुंबई महापालिकेने डिसेंबर २०१७ पासून या अभियानाची अंमलबजावणी सुरू केली आहे. याचा लाभ पालिका शाळांतील इयत्ता १० वी पर्यंतच्या मुलांना दिला जातो आहे. मात्र, याअंतर्गत आता ० ते ६ या अंगणवाडी, बालवाडीच्या मुलांनाही मोफत उपचार दिले जाणार आहेत. पालिका शाळेतील १८ वयोगटापर्यंतच्या मुलांच्या आरोग्याची तपासणी करून जन्मतः व्यंग, पोषणमूल्यांची कमतरता, शारीरिक, मानसिक विकासात्मक विलंब आणि आजार यांचे निदान करून त्यांना तातडीने उपचार मिळावेत, असा या अभियानामागचा मुख्य उद्देश आहे.

- Advertisement -

२ लाख ६९ हजार ८९३ बालक घेणार याचा लाभ

प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने आता ० ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना आरोग्याच्या दृष्टीने पालिका रुग्णालयाकडून मोठा दिलासा मिळणार आहे. या अभियानाअंतर्गत आरोग्य विषयक समस्या, अडचणीचे निवारण करणे, योग्य ती संदर्भ सेवा देणे, किरकोळ गंभीर आजारांवर वैद्यकीय उपचार शल्य चिकित्सा, शस्त्रक्रिया करणे आणि पाठपुरावा करणे शक्य होणार आहे. याचा लाभ २ लाख ६९ हजार ८९३ बालकांना घेता येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -