घरमुंबईरेल्वे कर्मचार्‍यांना सरकारचे गिफ्ट

रेल्वे कर्मचार्‍यांना सरकारचे गिफ्ट

Subscribe

७८ दिवसांचा पगार बोनस

दिवाळी काही महिन्यांवर आली असताना केंद्र सरकारने रेल्वे कर्मचार्‍यांना दिवाळीचे गिफ्ट जाहीर केले आहे. रेल्वे कर्मचार्‍यांना ७८ दिवसांचा पगार हा बोनसच्या स्वरुपात मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा ११ लाख कर्मचार्‍यांना होणार आहे. बुधवारी येथे झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

देशातील ११ लाख ५२ हजार रेल्वे कर्मचार्‍यांना दिवाळी बोनस म्हणून ७८ दिवसांचा पगार देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. गेली सलग सहा वर्षे रेल्वे कर्मचार्‍यांना विक्रमी बोनस दिला जातो. यंदाही रेल्वे कर्मचार्‍यांना ७८ दिवसांचा पगार बोनस म्हणून दिला जाणार आहे.

- Advertisement -

त्याचा फायदा सुमारे साडेअकरा लाख कर्मचार्‍यांना होणार आहे, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. रेल्वे कर्मचार्‍यांना दिल्या जाणार्‍या बोनसमुळे सरकारी तिजोरीवर २०२४ कोटी रुपयांचा बोझा पडणार आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेला बोनस हा रेल्वे कर्मचार्‍यांच्या मेहनतीचे हे फळ असून त्यांच्यासाठी मोठे गिफ्टच असणार आहे. सणाच्या सुरुवातीलाच मिळणार्‍या बोनसच्या बाबत अधिक मागणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु बोनस फक्त नॉन गॅजेटेड कर्मचार्‍यांनाच देण्यात येणार आहे. हा एक प्रकारचा प्रोडक्टिव्हिटी लिंक बोनस असणार आहे. गेल्या वर्षात प्रति कर्मचार्‍याला बोनसची जास्तीत जास्त रक्कम 17951 रुपये देण्यात आली होती. तर दसर्‍यापूर्वी रेल्वेच्या कर्मचार्‍यांना हा बोनस देण्यात येतो. यापूर्वी 72 दिवसांच्या पगारासोबत बोनस दिला जात होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -