घरमुंबईआईने मोबाईल दिला नाही म्हणून आत्महत्या केली!

आईने मोबाईल दिला नाही म्हणून आत्महत्या केली!

Subscribe

मोबाईल दिला नाही म्हणून एका नववीच्या विद्यार्थांनीने आत्महत्या केली आहे.

आईने मोबाईल हिसकावून घेतला म्हणून एका नऊवीच्या विद्यार्थींनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईच्या कोपरखैरणे परिसरात घडली आहे. ही मुलगी १४ वर्षांची होती. तिने आपल्या आईच्या ओढणीने घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. आत्महत्या करणारी मुलगी अभ्यासात हुशार होती. मोबाईलचा जसा फायदा आहे, तसा मोबाईलचा हा देखील मोठा तोटा आहे. मोबाईलसाठी विद्यार्थी आत्महत्या करीत आहेत, ही फार वाईट गोष्ट आहे. याअगोदरही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. आता पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.

हेही वाचा – गिरगावात तरुणीची गळफास लावून आत्महत्या

- Advertisement -

का केली आत्महत्या?

सध्या मोबाईलची क्रेझ वाढली आहे. प्रत्येक लहान मुलाला मोबाईल हवा आहे. लहानग्या मुलांनी रडू नये म्हणून पालक मुलांच्या हातात सर्रासपणे मोबाईल देतात. मोबाईलचे गेम्स किंवा गाणे वगैरे लावून देतात. परंतु, या मोबाईलचा मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होत आहे. मोबाईलमधील विविध गेम्समुळे मुलांना या मोबाईलविषयी आकर्षण वाढते आणि असे प्रकार घडताना दिसतात. आत्महत्या करणारी विद्यार्थी ही नववीत शिकत होती. ती अभ्यासात अतिशय हुशार होती. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी तिच्या आग्रहखातर पालकांनी तिला मोबाईल घेऊ दिला. नाताळच्या सुट्या संपल्यानंतर तिने अभ्यासाकडे लक्ष द्यावे, याशाठी विद्यार्थीनीच्या आईने तिच्या जवळचा मोबाईल काढून घेतला. यामुळे विद्यार्थीनी नाराज होती. गुरुवारी दुपारी ती शाळेतून घरी आली. तिने आपल्या आईजवळ मोबाईल मागितला. पंरतु, आईने मोबाईल देण्यास नकार दिला. त्यामुळे रागावलेल्या विद्यार्थीनीने आपल्या आईच्या ओढणीने घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेबाबत आईला माहित पडताच तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात गेल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलीस पुढील तपास घेत आहेत.

हेही वाचा – आईचा मोबाईलला नकार; मुलाची आत्महत्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -