घरमुंबईGokhale Bridge : संबंधितांचे निलंबन करून चौकशी होणार का? आदित्य ठाकरेंनी घेतला...

Gokhale Bridge : संबंधितांचे निलंबन करून चौकशी होणार का? आदित्य ठाकरेंनी घेतला पोल

Subscribe

मुंबई : अंधेरी येथील गोखले पुलावरून सध्या मुंबई महापालिकेवर चौफेर टीका करण्यात येत आहे. या पुलाच्या पुनर्बांधणीतील अपयशाला जबाबदार असलेले पालिका आयुक्त इकबालसिंह चहल आणि संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे कालच (शुक्रवारी) केली आहे. तर, आज, शनिवारी याबाबत लोकांची मते आजमविण्यासाठी त्यांनी ट्विटरवर पोल घेतला आहे.

हेही वाचा – Thackeray group : मोदी-शहा घोडेबाजारात बसून सौदे करतायत, ठाकरे गटाचा घणाघात

- Advertisement -

मुंबईत 3 जुलै 2018 रोजी अंधेरी येथील गोपाळ कृष्ण गोखले पुलाचा काही भाग कोसळून दोन जणांचा बळी गेला होता. या पुलाच्या दुरुस्तीचे काम पालिकेकडून हाती घेण्यात आले होते. या पुलाच्या पुनर्बांधणीचे कार्यादेश 20 एप्रिल 2020 रोजी देण्यात आले. तर पुलाच्या पुनर्बांधणीचे काम 15 मार्च 2021 रोजी सुरू झाले. तर, आता या पुलाची पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारी एक मार्गिका मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते 26 फेब्रुवारीपासून खुली करण्यात आली. पण बर्फीवाला पूल आणि नवीन गोखले पूल जोडण्यात येणार आहे, पण यामध्ये सुमारे दीड मीटर उंचीचे अंतर आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट (व्हीजेटीआय) संस्थेची मदत घेण्यात येत आहे.

- Advertisement -

यासंदर्भात राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे आक्रमक झाले असून त्यांनी थेट राज्यपाल बैस यांनाच पत्र पाठवले आहे. मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाने केलेली गोखले पुलाची पुनर्बांधणी ही देशाच्या दृष्टीने लाजिरवाणी ठरणारी आहे. तरीही दोन्ही प्रशासन एकमेकांवर दोषारोप करत आहेत. त्यामुळे या प्रकल्पातील मुख्य दायित्व असलेले महापालिका आयुक्त चहल आणि रेल्वेच्या समकक्ष अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश जारी करावेत. जेणेकरुन त्यांना या प्रकल्पात हस्तक्षेप करून गडबड करता येणार नाही आणि निर्लज्जपणे करदात्यांच्या कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केल्याबद्दल निष्पक्ष चौकशीला सामोरे जाता येईल, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

हेही वाचा – Pawar Vs Pawar : कोणत्या धरणातून सिंचन करून साम्राज्य उभे केले…, रोहित पवारांचा अजितदादांना टोला

तर, आज, शनिवारी आदित्य ठाकरे यांनी, गोखले पूल चुकीचा बनवून मुंबईकरांना लुटणारे मुंबई महापालिकेचे प्रशासक इकबालसिंह चहल आणि रेल्वे अधिकारी यांचे निलंबन करून चौकशी होणार का? असा प्रश्न नागरिकांना विचारला आहे. होय, नाही – मुख्यमंत्र्यांचे लाडके आहेत, भाजपामध्ये जातील आणि छे, पदोन्नती मिळेल असे चार पर्याय दिले आहेत. तासाच्या आत जवळपास 900 नागरिकांनी यात सहभाग घेतला असून त्यापैकी 48.8 टक्के लोकांनी ‘नाही – मुख्यमंत्र्यांचे लाडके आहेत’ या पर्यायाची निवड केली आहे. तर, भाजपामध्ये जातील, असे मत 24.1 टक्के लोकांनी नोंदवले आहे.

हेही वाचा – BJP vs Thackeray : …म्हणून ‘बंद खोलीतील’ रडगाणे पुन्हा सुरू झाले, बावनकुळेंची ठाकरेंवर टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -