घरमुंबईएसटी कर्मचाऱ्यांसाठी अच्छे दिन

एसटी कर्मचाऱ्यांसाठी अच्छे दिन

Subscribe

एसटी महामंडळाच्या १ एप्रिल २०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढीतील फरकाची रक्कम हफ्त्यामध्ये न देता ती एकर कमी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली.

एसटी महामंडळाच्या १ एप्रिल २०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढीतील फरकाची रक्कम हफ्त्यामध्ये न देता ती एकर कमी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली. राज्यातील एसटी महामंडळाच्या सुमारे १३ हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार असून त्यांना अंदाजे २४० कोटी रुपयांच्या फरकाची रक्कम एकर कमी देण्यात येईल. दिवाकर रावते यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथीगृहात आज महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल, एसटीचे महाव्यवस्थापक माधव काळे, वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी अशोक फळणीकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

दिवाकर रावते यांनी जून २०१८ मध्ये एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४ हजार ८४९ कोटी रुपयांची वेतनवाढ जाहीर केली होती. या वेतनवाढीचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे १ एप्रिल २०१६ पासून देण्याचा निर्णयही त्यांनी घेतला होता. एप्रिल २०१६ ते जून २०१८ या दरम्यानच्या काळातील फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना हफ्त्यामध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आाला होता. पण सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ही फरकाची रक्कम हफ्त्यामध्ये न देता ती एकरकमी देण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना दिवाकर रावते यांनी यावेळी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

- Advertisement -

या निर्णयामुळे महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जून २०१६ नंतर आत्तापर्यंत महामंडळाचे सुमारे १३ हजार कर्मचारी निवृत्त झाले असून त्यांना अंदाजे २४० कोटी रुपयांच्या फरकाची रक्कम वितरीत करण्यात येणार आहे. यापुढे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही उर्वरीत फरकाची रक्कम सेवानिवृत्तीनंतर एकरकमी देण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -