घरमुंबईआम्हाला पण शिकायचंय...

आम्हाला पण शिकायचंय…

Subscribe

मुरबाड तालुक्यातील भादणेत आजीबाईंची शाळा

मुरबाड तालुक्यातील भादणे गावात आजीबाईची शाळा चालवली जाते. एकेकाळी अक्षर ओळखही नसलेल्या निरक्षर ३० आजीबाई शाळेत शिकत आहेत. दर शनिवार-रविवारी ही शाळा भरते. अगदी ९४ वर्षांच्या आजीबाई देखील न चुकता शाळेत येतात. आत आजींबाईच्या शाळेवर आता एक सिनेमा देखील येत आहे. योगेंद्र बांगर यांनी भादणे गावात शाळेत शिक्षकाची नोकरी करीत असताना २०१६ पासून गावातील आजीबाईंसाठी शाळा सुरू केली. गावकर्‍यानी देखील त्यांना चांगली साथ दिली. आता शीतल मोरे या शिक्षिका आजीबाईंना शिकवण्याचे काम करतात.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ संचालित पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या ठाणे येथील आनंद विश्व गुरूकुल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नुकताच ठाणे ग्रामीण भागाचा अभ्यास दौरा करून ग्रामीण भागातील जनजीवन, आदर्श गाव योजना ग्रामपंचायत आदींची पाहणी केली. मुरबाड तालुक्यातील भादाणे गावातील आजीबाईच्या शाळेला भेट देऊन तेथील अनोख्या शाळेत शिकत असलेल्या आजीबाईंशी संवाद साधला. मुलांच्या अभ्यासक्रमाचा हा भाग म्हणून हा दौरा आयोजित करण्यात आला होता. पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या एकूण ३५ मुले या दौरासाठी सहभागी झाले होते.

- Advertisement -

सुरूवातीला धसईजवळील शिरवाडी या केवळ ३५ कुटुंब असलेल्या आदिवासी पाड्याला भेट देऊन आदर्श गाव म्हणून त्याचा कसा कायापालट गावकर्‍यांनी केला, त्याची पाहणी विद्यार्थ्यांनी केली. एकेकाळी पाण्याचे दुर्भिष्य असलेल्या गावात आता बोअरला मे महिन्यातही पाणी असते. गावात कुर्‍हाड बंदी असून प्रत्येक घरात शौचालय, शोष खड्डे, रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेले आहे. गावात सोलर दिवे बसवले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -