घरताज्या घडामोडीमुंबईत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी

मुंबईत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी

Subscribe

मुंबईत विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत गुरूवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यानंतर दुपारी जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. 

मुंबईत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत गुरूवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यानंतर दुपारी जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईच्या दादर, घाटकोपर, चेंबूर, वरळी, माटुंगा यासंह मुंबईच्या अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

परतीच्या पावसाने राज्यभरात चांगलाच जोर धरला आहे. या परतीच्या पावसाचा काढणीला आलेल्या पिकांना मोठया प्रमाणावर फटका बसला आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस आणि भाजीपाल्याचा समावेश आहे. यासोबतच द्राक्ष बागांनासुद्धा या परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. आजही राजाच्या काही भागात पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रासोबतच इतर राज्यांमध्येही जोरदार पाऊस कोसळत आहे. सर्वत्र नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मुंबई ठाण्यासह सांगली, अहमदनगर, पुणे, बीड, कोल्हापूर, धुळे, पालघर, लातूर, सोलापूर, या जिल्ह्यांमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान आजही हवामान खात्याने राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

हा परतीचा पाऊस उद्या14 ऑक्टोबरपर्यंत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर म्हणजे 15 ऑक्टोबरपासून राज्यात ढगाळ असेल आणि पावसाची उघडीप जाणवेल, अशी माहिती मिळते.

- Advertisement -

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज होता. त्याप्रमाणे मागील दोन ते तीन दिवस पाऊस झाला आहे. आता शनिवारन 15 ऑक्टोबरपासून राज्यात ढगाळ वातावरण जरी असले तरी संपूर्ण महाराष्ट्रात उघडीपच जाणवेल.


हेही वाचा – राजीनामा का स्वीकारला नाही? मुंबई पालिकेला तासाभराचा अल्टिमेटम, उच्च न्यायालयाने फटकारले

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -