घरमनोरंजनकोणत्या पक्षातून राजकारणात प्रवेश करशील? या प्रश्नाचं उत्तर देत कियारा अडवाणी म्हणाली...

कोणत्या पक्षातून राजकारणात प्रवेश करशील? या प्रश्नाचं उत्तर देत कियारा अडवाणी म्हणाली…

Subscribe

अभिनेत्री कियारा अडवाणी म्हणाली, मी मुंबईत जन्मले. याच शहरात वाढले. मुंबई हे माझं घर आहे; म्हणून या मराठी पुरस्काराचं मोल माझ्यासाठी खूप आहे, अशी कृतज्ञ भावना कियाराने व्यक्त केली.

शेरशहा चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेत्री कियारा अडवाणी हीचं विशेष कौतुक झाले. याच चित्रपटाच्या भूमिकेसाठी अभिनेत्री कियारा अडवाणी हिला ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराचा देण्यात आला आहे. या पुरास्कार सोहळ्यात कियारा अडवाणी हिने केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे.

हे ही वाचा – किशोर कुमार : रसिकांवर अधिराज्य गाजविणारा आवाज

- Advertisement -

अभिनेत्री कियारा अडवाणी म्हणाली, मी मुंबईत जन्मले. याच शहरात वाढले. मुंबई हे माझं घर आहे; म्हणून या मराठी पुरस्काराचं मोल माझ्यासाठी खूप आहे, अशी कृतज्ञ भावना कियाराने व्यक्त केली. ‘वर्षभरात बॉलिवूड मधील चित्रपट फ्लॉफ ठरत असतानाच, बॉलिवूडला अनेक धक्के बसत असताना ‘शेरशहा’, ‘भूलभुलैय्या’ आणि ‘जुग जुग जियो’ हे कियाराचे तीन चित्रपट सुपरहीट ठरले होते. यावरच बोलताना कियारा म्हणाली, परमेश्वराची कृपा आणि प्रेक्षकांचं प्रेम!… ते असंच कायम राहू दे माझ्यावर!

हे ही वाचा – आम्ही दोघेही कामात व्यग्र असलो तरी… रणवीरसोबच्या नात्यावर दीपिकाने केला खुलासा

- Advertisement -

दरम्यान लोकमत वृत्तपत्र समुहाचे चेअरमन विजय दर्डा यांनी कियाराला प्रश्न विचारला, ‘समजा तुला राजकारणात प्रवेश करायचा असेल, तर तू कुणाच्या पक्षात जाशील?’ असा थेट प्रश्न विचारल्याने कियारासुद्धा गोंधळून गेली त्यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेला तिचा सहकलाकार रणवीर सिंग तिला उत्तर देताना मदत व्हावी म्हणून पुढे सरसावत म्हणला, ‘आवाज नही आ रही है बोलो कियारा… माईक बंद पड गया, नीचे आ जाओ कियारा, सवाल में फंसना मत!’ रणवीरचे हे उत्तर ऐकून प्रेक्षक सुद्धा हसू लागले. शेवटी कियाराच म्हणाली, मी माझ्या अभिनयापुरतीच ठीक आहे!

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -