घरमुंबईVIDEO: नालासोपाऱ्यात सोशल डिस्टन्सिंगचे नागरिकांनी वाजवले बारा

VIDEO: नालासोपाऱ्यात सोशल डिस्टन्सिंगचे नागरिकांनी वाजवले बारा

Subscribe

नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगला पायदळी तुडवत गर्दी करून दुकानासमोर लावल्या लांबच लांब रांगा

देशभरात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत असताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन वेळोवेळी नागरिकांना आपल्या घरी सुरक्षित रहा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, असे वारंवार सांगत असताना देखील काही भागात प्रशासनाच्या या नियमांना केराची टोपली नागरिक दाखवताना दिसत आहेत. गर्दीच्या ठिकाणी असणारा नागरिकांचा वावर कमी व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. मात्र नालासोपाऱ्यात सोशल डिस्टन्सिंगचा नागरिकांनी बारा वाजल्याचे समोर आले आहे.

सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

स्वस्तात धान्य मिळणाऱ्या रेशन दुकाने उघडली असल्याने पुरेसा धान्याचा साठा करून ठेवू या मानसिकतेने नालासोपाऱ्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या सर्वच नागरिकांनी घरात रहाणं गरजेचं असताना नालासोपाऱ्यात हा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून लोकांनी धान्य खरेदी करण्यासाठी एकच झुंबड उडवली आहे.

- Advertisement -

नालासोपाऱ्यात सोशल डिस्टन्सिंगचा वाजला बोऱ्या, नागरिक बिनबोभाट रस्त्यावर!

नालासोपाऱ्यात सोशल डिस्टन्सिंगचा वाजला बोऱ्या, नागरिक बिनबोभाट रस्त्यावर!

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 3, 2020

असा आहे व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग या नियमाला पायदळी तुडवत गर्दी करून दुकानासमोर लांबच लांब रांग केलेली दिसते. विशेष म्हणजे या नागरिकांनी कोणत्याही प्रकारची स्वतःची दक्षता न घेता रस्त्यावर गर्दी केलेली दिसत आहे. जर कोरोनाचा प्रादुर्भाव दुर्दैवाने नालासोपाऱ्यात झाला तर त्याला जबाबदार कोण असणार? सध्या हा एकच प्रश्न उपस्थित होत आहे.


CoronaVirus: तबलीग जमातच्या कोरोनाग्रस्तांचे नर्सेससमोर अश्लील हावभाव!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -