घरCORONA UPDATECoronaEffect: मोदींचं ५ तारखेला दिवे लावायचं आवाहन, पण नेटिझन्स आत्ताच पेटले!

CoronaEffect: मोदींचं ५ तारखेला दिवे लावायचं आवाहन, पण नेटिझन्स आत्ताच पेटले!

Subscribe

येत्या रविवारी म्हणजेच ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी दिवे, टॉर्च, मेणबत्ती किंवा मोबाईल फ्लॅश लाईट लावण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज सकाळी ९ वाजता केलं. या आवाहनातला हा ९ चा आकडा योगायोग म्हणता येईल असं अनेकांना वाटत नाहीये. कोरोनाविरोधातल्या लढ्यात समस्त भारतीय एकजूट आहेत, हे जगाला दाखवून देण्यासाठी मोदींनी हे दिवे लावण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, अवघ्या काही तासांमध्येच त्यावर कौतुकापेक्षा टीकाच जास्त होऊ लागली आहे. महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांनी त्यावर टीका केली आहेच. पण नेटिझन्सनी यावर एक सो एक मीम्स टाकून आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवे लावण्याचं आवाहन केल्यानंतर लगेचच ट्वीटरवर #ModiVideoMessage, #9Baje9Minute, #मोदी_मदारी_बंदर_कौन, #diyajalao,#5thApril असे काही ट्वीटर ट्रेंड ट्रेंडिंग व्हायला लागले. या सगळ्या ट्रेंडमध्ये बहुतेक सगळे मोदींच्या आवाहनावर मीम्स करणारेच आहेत.

- Advertisement -

काही नेटिझन्सची मोदींच्या आवाहनात वैज्ञानिक कारण शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे…

- Advertisement -

काहींनी नासाकडून ५ एप्रिल रात्री ९ वाजेचं भारताचं छायाचित्र आत्ताच जारी केल्याचं सांगितलंय…

काहींनी तर लगेच या आवाहनामागचं वैज्ञानिक कारण सांगायला सुरुवात केली..

अनेकांनी मोदींच्या थाळीनादाच्या आवाहनाचा कसा फज्जा उडाला, त्याची आठवण करून दिली…

मोदींकडून काय सांगणं अपेक्षित होतं, हे काहीजण सांगतायत…

अनेकांना शोले सिनेमाची आठवण झाली…

अनेकांनी तर लगेच विज्ञानाचे फॉर्म्युलेच मांडायला सुरुवात केली…

५ एप्रिलचं नक्की चित्र काय असेल, याचा अंदाज काहींनी बांधलाय…

मोदींनी २२ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस अशा जीवनावश्यक सेवा पुरवणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यासाठी थाळीनाद, घंटानाद, टाळीनाद किंवा कोणतीही वस्तू वाजवून कृतज्ञता व्यक्त करण्याचं आवाहन केलं. पण परिणामी अनेकांनी थेट मोर्चे आणि मिरवणुका काढून ढोल-ताशे बडवले. त्यामुळे पहिल्याच दिवशी सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजले. आता पुन्हा एकदा मोदींनी असंच काहीसं आवाहन केलं आहे. याला लोकं कसा प्रतिसाद देतात त्यावरून मोदींच्या ट्रोलर्सला उत्तर मिळेल की त्यांचा मुद्दा खरा ठरेल, हे सिद्ध होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -