घरदेश-विदेशबायकोचे ATM कार्ड वापरण्यापूर्वी 'हे' नियम नक्की वाचा

बायकोचे ATM कार्ड वापरण्यापूर्वी ‘हे’ नियम नक्की वाचा

Subscribe

आपण नेहमी आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना किंवा जवळच्या नातेवाईकांना ATM कार्ड वापरायला देता. पण असं करणं काही वेळा महागात पडू शकते. ATM कार्ड दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करता येत नाही, असं देशातील सर्वात मोठ्या बँक SBIचे म्हणणं आहे. नॉन ट्रान्सफरेबल ATM कार्ड असतं. कुटुंबातील सदस्याला ATM वापरायला देताना विचार करावं. इतकंच नव्हे तर नवरा-बायकोने देखील एकमेकांचे ATMचे कार्ड वापर करू नये. जर असं केलं तर नियमांच्या विरोधात जाण्याप्रमाणे आहे. कोणत्याप्रकारचे नुकसान होवू नये असं तुम्हाला वाटत असेल तर ATMचा कार्डचा वापर सावधपणे करणं गरजेचं आहे. त्यामुळे आज आपण ATMचा कार्डचा वापर करताना कोणत्या गोष्टी कराव्यात हे पाहणार आहोत.

ATMद्वारे व्यवहार करताना ‘या’ गोष्टी ध्यानात ठेवा

  • ATMद्वारे व्यवहार करताना प्रायव्हसीची पूर्णपणे काळजी घ्या.
  • पिन टाकताना आजूबाजूला कोणी आहे की नाही याची खात्री करून घ्या.
  • व्यवहार झाल्यानंतर मशिन स्क्रीनवर वेलकम आल्याशिवाय ATM रुमबाहेर पडू नका.
  • ATMमध्ये अजून एखादे डिव्हाईस लावण्यात आले असेल तर त्यावर लक्ष असूद्या.
  • महत्त्वाचे तुमचा चालू असलेला नंबर बँकेमध्ये रिजस्टर्ड करा. यामुळे तुम्हाला ATMद्वारे केलेल्या व्यवहाराचे सर्व अपडेट येतील.
  • बँकेकडून येणार अलर्ट मेसेज आणि स्टेटमेंट नेहमी तपासा.
  • तसेच शॉपिंग दरम्यान ATMद्वारे व्यवहार करत असाल तर मर्चंटकडून कार्ड घेण्यास विसरू नका.
  • जर ATMमधून पैसे काढूनही तुम्हाला पैसे मिळाले नसतील आणि तुम्हाच्या अकाऊंटमधून पैसे वजा झाले असतील तर त्वरित बँकेशी संपर्क साधा.

ATMचा वापर करत असाल तर या गोष्टी अजिबात करू नका

  • ATMकार्डच्या मागे किंवा त्याचा कव्हरवर पिन लिहू नका.
  • अज्ञात व्यक्तींकडून ATMद्वारे व्यवहार करताना मदत घेऊ नका.
  • तसेच कोणत्याही व्यक्तीला तुमचा ATMचा पिन सांगू नका.
  • ATMद्वारे कोणताही घाईघाईत व्यवहार करू नका.
  • विशेषतः ATMद्वारे व्यवहार करत असालं तर मोबाईवर बोलणं टाळा.

३ मार्गांनी कार्ड करू शकता ब्लॉक

  • तुम्हाला जर SBI डेबिट/ATM कार्ड ब्लॉक करायचे असेल तर तुम्हाला टोल फ्री नंबर १८००-११-२२-११, १८००-४२५-३८०० किंवा ०८०-०८०-२६५९९९९० यावर संपर्क करावा लागेल. त्यानंतर कॉलवर मिळालेल्या सूचनाचे पालन करून तुम्ही कार्ड ब्लॉक करू शकता.
  • तसेच तुम्ही SBI Quick App च्या साहाय्याने कार्ड ब्लॉक करू शकता.
  • SMS च्या माध्यमातून तुम्ही कार्ड ब्लॉक करू शकता. यासाठी तुम्हाला ‘BLOCK<space>कार्डवरील शेवटचे 4 डिजिट’ लिहून ५६७६७६ या क्रमांकावर पाठवाव. यासाठी तुमचा नंबर बँकेमध्ये रजिस्टर्ड असावा लागतो.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -