घरमुंबईIAS Transfer : अभिजित बांगर, सैनी मुंबई महापालिकेत, तर अश्विनी भिडे, पी....

IAS Transfer : अभिजित बांगर, सैनी मुंबई महापालिकेत, तर अश्विनी भिडे, पी. वेलरासू यांची बदली

Subscribe

मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या दट्ट्यानंतर राज्य सरकारने आज (19 मार्च) संध्याकाळी उशीरा मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, पी. वेलरासू, ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह अन्य सनदी अधिकाऱ्यांच्या  बदल्यांचे आदेश जारी केले. (IAS Transfer Abhijit Bangar Amit Saini transferred to Mumbai Municipal Corporation Ashwini Bhide P Velrasu transferred)

हेही वाचा – BMC : मुंबई महापालिकेला लाभणार नवे आयुक्त? निवडणूक आयोगाने नावे  मागवली

- Advertisement -

सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार अश्विनी भिडे यांची बदली मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. तर  भिडे यांच्या जागी जलजीवन मिशनचे अभियान संचालक  अमित सैनी यांची नेमणूक झाली आहे. मुंबई महापालिकेचे आणखी एक अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांची बदली झाली असून त्यांच्या जागी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना नियुक्ती देण्यात आली आहे. वेलरासू यांची बदली करताना त्यांना नव्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची नियुक्ती आयुक्त, सहकार आणि निबंधक, सहकारी संस्था पुणे या पदावर करण्यात आली आहे.

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी संजय मीना यांची नेमणूक झाली आहे. सनदी अधिकारी अंकित यांची बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी, शुभम गुप्ता यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी तर विशाल नरवाडे यांची धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Tejaswini Ghosalkar : मलाही त्याच कार्यक्रमाला बोलवण्यात आलं होतं; अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीचा दावा

अन्य बदल्या पुढीप्रमाणे

कार्तिकेयन एस. मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी पुणे यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या पदावर. संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे या पदावर. पृथ्वीराज बी.पी, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, नागपूर यांची नियुक्ती अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका या पदावर. डॉ. कुमार खेमनार, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका यांची नियुक्ती साखर आयुक्त, पुणे या पदावर.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -