घरपालघरअग्निशमन दलात रिक्त जागावर ठेका कर्मचार्‍यांची नियुक्ती

अग्निशमन दलात रिक्त जागावर ठेका कर्मचार्‍यांची नियुक्ती

Subscribe

स्थायी भरती होत नाही तोपर्यंत कार्यरत अग्निशमन कर्मचार्‍याच्या मदतीला कंत्राटी पद्धतीने मजूर घेण्यात आले होते. शहरात आगीच्या घटना वाढत आहेत.

भाईंदर :- मीरा-भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन विभागात अनेक जागा रिक्त होत्या. त्यामुळे अग्निशमन दलात मनुष्यबळाची अडचण निर्माण होत होती. त्यामुळे उपलब्ध असलेल्या मनुष्यबळावर कामाचा ताण येत होता. पुरेशे कर्मचारी उपलब्ध व्हावेत यासाठी खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून ठेका पद्धतीवर १०० अग्निशामक कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही वर्षांत अनेक भागात नवीन अग्निशमन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. शहरात अनेक मोठ मोठ्या इमारती उभारल्या जात आहेत. शहराची लोकसंख्या देखील झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अग्निशमन विभागात नवीन भरती करणे आवश्यक होते. स्थायी भरती होत नाही तोपर्यंत कार्यरत अग्निशमन कर्मचार्‍याच्या मदतीला कंत्राटी पद्धतीने मजूर घेण्यात आले होते. शहरात आगीच्या घटना वाढत आहेत.

वाढत्या आगीच्या घटनांमुळे आणखी अग्निशामकांच्या जागा भरण्याची गरज होती. त्यामुळे मजुरांचे ठेके रद्द करून अग्निशामक पदाच्या १०० रिक्त जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी कार्यवाही सुरू केली होती. ही आचारसंहिता लागण्यापूर्वी पूर्ण करत अग्निशामक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच काही मजूर देखील त्यांच्या मदतीसाठी नेमले जाणार आहेत. त्यामुळे थोड्या प्रमाणात कर्मचार्‍यांची कमतरता दूर झाली आहे. या जवानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना गणवेश व इतर साहित्य महापालिकेकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. लवकरच गणवेश व इतर साहित्य पुरवले जाणार असल्याची माहिती उपायुक्त संजय शिंदे यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -