घरमुंबईआयसीएसईचा दहावी, बारावीचा निकाल जाहीर

आयसीएसईचा दहावी, बारावीचा निकाल जाहीर

Subscribe

द कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनकडून (सीआयएससीई) शुक्रवारी संकेतस्थळावर दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर करण्यात आले. दहावीच्या परीक्षेला देशभरातून 2 लाख 7 हजार 902 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तर महाराष्ट्रामधून दहावीला 23 हजार 336 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

द कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनकडून (सीआयएससीई) शुक्रवारी संकेतस्थळावर दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर करण्यात आले. देशामध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलांची संख्या अधिक होती. मात्र राज्यामध्ये दहावीच्या परीक्षेमध्ये मुलांची तर बारावीच्या परीक्षेत मुलींची संख्या अधिक आहे.

आयसीएसईकडून result.cisce.org या बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर शुक्रवारी दुपारी ३ वाजता निकाल जाहीर करण्यात आले. आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षेला देशभरातून २ हजार ३४१ शाळांमधून २ लाख ७ हजार ९०२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये १ लाख १२ हजार ६६८ मुले तर ९५ हजार २३४ मुली परीक्षेला बसल्या होत्या. यातील २ लाख ६ हजार ५२५ विद्यार्थी उतीर्ण झाले असून, १३७७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्रात २२६ शाळांमधून दहावीला २३ हजार ३३६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये १२ हजार ७४७ मुले आणि १० हजार ५८९ मुली होत्या. यातील २३ हजार ३१९ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत.

- Advertisement -

बारावीला देशातून ११२५ शाळांतून ८८ हजार ४०९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये ४७ हजार ४२९ मुले तर ४० हजार ९८० मुली होत्या. यातील ८५ हजार ६११ विद्यार्थी उतीर्ण झाले असून, २७९८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्रात ५१ शाळांमधून बारावीची परीक्षा दिलेल्या ३ हजार १५० विद्यार्थ्यांमध्ये १ हजार ४७० मुले तर १ हजार ६८० मुली होत्या. यातील ३ हजार १०४ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. दहावीच्या परीक्षेला ६१ विषय असून, २२ भारतीय भाषा, ९ परदेशी भाषा आणि २ क्लासिकल भाषांमधून देता येते. तर बारावीला ५१ विषय असून, १५ भारतीय भाषा, ६ परकीय भाषा आणि एक क्लासिकल भाषा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -