घरमुंबईअवैध दारू धंद्यांविरोधात धडक मोहीम

अवैध दारू धंद्यांविरोधात धडक मोहीम

Subscribe

12 गुन्हे दाखल,4 वाहने जप्त,साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त

पालघर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या आठ दिवसात अवैध दारुविरोधात धडक मोहिम हाती घेतली असून त्यात आतापर्यंत 12 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये दारूची बेकायदा वाहतूक करणार्‍या चार गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. तर तब्बल साडेसात लाखांची दारु जप्त करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क पालघर विभागाकडून अवैध दारू निर्मिती केंद्र, अवैध दारू धंदे आणि परराज्यातून अवैध दारू वाहतूक करणार्‍या मद्य तस्कराविरोधात धडक करवाई करण्यात येत आहे. एका आठवड्यात केलेल्या धडक करवाईत पालघर राज्य उत्पादन शुल्क विभागाने तब्बल 7 लाख 47 हजार 135 रूपयांची दारू हस्तगत केली आहे. यात विदेशी दारूसह ताडी आणि हातभट्टीच्या दारूचा समावेश आहे. या कारवाईत एक स्कोर्पियो जीप, दोन स्कूटी, एक पल्सर जप्त करण्यात आली असून चार जणाना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

राज्य उत्पादन शुल्क पालघर जिल्ह्याचे एसपी डॉ. व्ही. टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालघर विभागाचे निरीक्षक दिलीप बामणे यांच्या नेतृत्त्वाखाली ही करवाई वसईतील भाटपाडा, अर्नाळा किल्ला, वडराई, शिरगाव आदी भागात करण्यात आली. या छाप्या दरम्यान या ठिकाणी गावठी दारू तयार करण्यासाठीचे रसायन, जमिनीत लोखंडी व प्लास्टिक ड्रममध्ये ठेवलेले या पथकाला आढळले. हे साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

दरम्यान, खानीवडे टोलनाका, विरार फाटा आणि भालिवली याठिकाणी केलेल्या कारवाईत दमण बनावटीची 90 लिटर दारू जप्त करण्यात आली असून महामार्गालगतच्या ढाबे आणि चायनीज सेंटरची कसून तपासणी करण्यात येत असल्याची माहिती दुय्यम निरीक्षक संजय मोहिते यांनी दिली. यापथकात निरीक्षक दिलीप बामणे, दुय्यम निरीक्षक संजय मोहिते यांच्यासह दुय्यम निरीक्षक तुषार आरेकर, कॉन्स्टेबल अमोल नलावड़े, केशव भुरकुड़, भावेश बंगार आणि सहायक दुय्यम निरीक्षक रणपिसे यांचा समावेश होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -