घरफिचर्सआम्हा वंचितांचा लाभ !

आम्हा वंचितांचा लाभ !

Subscribe

काय रं भावड्या,आरं त्या अडाळकर सायबांच्या कार्यालयावरचा झ्येंडा काढताना पायला. आऱं,आणि येकजण तो सायबांचा फोटो पण काढताना दिसला, नेमकं काय चाललया काय समजना गेलंय? ,सायब बी दोन दिस झाल्यात हिकडं फिरकल्या बी नाहित, वंचित गटाचा कार्यकर्ता म्हाद्या थोड्या चिंतेतच म्हणाला.‘आरं बाबा सायब आता सत्ताधारी पक्षात जाणार हायती अशी बातमी म्या वाचलीया,आणि व्हयं एकाच्या खिडकीतून म्या त्या टीव्हीवर बघितलं,त्यात आपले सायब आणि सत्ताधार्‍यातले काही संत्री, मंत्री येकत्रच दिसले. वाटतं, त्यांनी सत्ताधारी गटात उडी मारलिया, भावड्याने तर्क वर्तवला. गेल्या काही दिवसांपासून अडळकर साहेब कार्यालयाकडे फिरकले नव्हते. याआधीच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी तळागाळातले नेते म्हणून ते आता पुढे आले होते. निवडणुकीची लिटमस टेस्ट त्यांना आता बराच भाव देऊन गेली होती. तसेच विरोधकांच्या नेत्याला पाडण्यात आणि सत्ताधार्‍यांना टक्कर देण्याचे मोठे काम अडळकर साहेबांनी केले होते. त्यामुळे आता ते सर्वांच्या गळ्यातील ताईत झाले होते. परंतु,आता कसोटीच्या वेळी सत्ताधार्‍यांनी फासा टाकून त्यांना आपल्यात घेण्यात यश मिळवले होते. वंचितांच्या मतात संधी शोधण्याचं काम सत्ताधार्‍यांनी केलं होतं. सायबांचा प्रवास तसा ‘हाफ’ पँट ते वंचित गटामध्ये ‘फुल्ल’ फार्म असाच होता. सत्ताधार्‍यांनी त्यांचा हा फुल्ल फॉर्म ओळखला आणि अडाळकरांना आत घेतले. तरी देखील कार्यकर्त्यांत संभ्रम होताच. इतक्या दिवस तुम्ही वंचित आहात आणि सत्ताधारी तुमच्यावर अन्याय करतायतं ते आता आपल्याला लाभार्थी व्हायची संधी आहे, हे पटवून देणं सायबांसाठी तेवढं कठीण नव्हतंच मुळात. गेल्या दोन महिन्यांच्या काळात धर्मनिरपेक्षतावाले कट्टरतावाद्यांच्या गोटात शिरताना सायबांनी पाहिले होते. साहेब कार्यालयाजवळ आले, म्हाद्या थोडा कचरतचं म्हणाला, साहेबं…तो झ्येंडा…त्याला मध्ये थांबवत, अरे किती दिवस आपण असे वंचितांच जीणं जगायंच,चला आता लाभार्थी होवू, तुमच्यासाठीच मी सत्ताधार्‍यांना जवळ केलं आहे, अडळकर साहेब मोठ्या रूबाबात म्हणाले. आता आपलं आरक्षण आपण घेऊनंच राहू,आता माघार नाही, साहेब रूबाबात म्हणाले. तो वंचितपणाचा झेंड्याच्या जागी आता तेज:पुंज असा सत्तेचा झेंडा लावा. आता हाच झेंडा आपल्याला खरा मार्ग दाखवेल, साहेबांनी पुन्हा कार्यकर्त्यांना आदेश दिला. कार्यकर्त्यांनी देखील मान डोलावली. खरं तर, सत्ताधारी पक्षाने विरोधकांसमोर आव्हान उभे करण्यासाठी आणि विरोधकांच्या मतदारसंघात काही ‘करामती’होतील या आशेने आपल्याला वंचितांचे ‘लाभार्थी’ केलंय हे सायबांना पण ठाऊक होते. पण ते तरी काय करणार आता…

( वंचितपणा हा कधीच न संपणारा नसतो याची सायबांना कल्पना होतीच. जो पर्यंत लाभ होत नाही तोपर्यंत आपण वंचित याचे आकलन एव्हाना त्यांना झाले होते.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -