Eco friendly bappa Competition
घर अर्थजगत समाजाच्या विकासासाठी सीएसआरला अनन्यसाधारण महत्त्व - भाजपा आमदार प्रवीण दरेकर

समाजाच्या विकासासाठी सीएसआरला अनन्यसाधारण महत्त्व – भाजपा आमदार प्रवीण दरेकर

Subscribe

मुंबई : समाजाच्या विकासासाठी सीएसआरला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सरकारला कधी कधी काही आर्थिक, कायदेशीर, तांत्रिक मर्यादा असू शकतात. परंतु सीएसआर हे माध्यम सरकारच्या पलीकडून जाऊन सामाजिक भावनेतून सकारात्मक कामाची निर्मिती करु शकते. त्यामुळे अशा प्रकारचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे, असे प्रतिपादन भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी आज व्यक्त केले.

इंडिया सीएसआर आणि फ्युअल स्किल इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आज मुंबईत महाराष्ट्र सीएसआर समिटचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भाजपा आमदार प्रवीण दरेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी दरेकर यांनी सांगितले की, एका चांगल्या आणि वेगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली आहे. भविष्यात राज्यामध्ये एनजीओ व सीएसआरचे एकत्रित अभियान राबविले जाऊ शकेल, यादृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे. जेणेकरून त्याच्या माध्यमातून राज्यामध्ये उत्तम प्रकारचे सामाजिक कार्य होईल.

- Advertisement -

सामाजिक संस्था आणि सीएसआर अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कारण स्वयंसेवी संस्था (एनजीओ) राजकारणापलीकडे जाऊन समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम करतात. संस्थेचा कारभार करताना शेवटी सगळी सोंग आपल्याला आणता येतात, परंतु निधी उभी करणे तेवढे सोपे नसते. अशा वेळी मदतीचा हात जर कोणी देत असेल तर ते कंपन्यांचे सीएसआर निधी असतो. त्या माध्यमातून सामाजिक संस्था समाजासाठी व लोकांसाठी सामाजिक कार्य करतात. अशा सीएसआर समिटच्या माध्यमातून सीएसआर कुठे उपलब्ध होते व कुठे दिला जातो, याचे मार्गदशन होऊ शकते, असेही दरकेर यांनी सांगितले.

सीएसआरचे उपक्रम राबविणाऱ्या कंपन्यांचा परिघ केवळ शहरांपुरता मर्यादित आहे. मुंबई, पुणे, ठाणे या परिसरामधील कंपन्या सीएसआरच्या माध्यमातून कार्य करतात. परंतु दुर्गम भागांमध्ये, आदिवासी भागांपर्यंत सीएसआर निधी गेला पाहिजे. कारण तिथे आदिवासी व उपेक्षित घटकांसाठी एखादा प्रकल्प अथवा योजना उभारावयाची असेल त्याला पुरेसा निधी मिळत नाही, त्यामुळे या समेटच्या माध्यमातून या विषयावरही चर्चा करणे, त्याचा लेखाजोखा मांडला गेला पाहिजे. सामाजिक संस्थांनी यासाठी नेमके काय केले पाहिजे, याची सविस्तर चर्चाही या व्यासपीठावर होण्याची आवश्यकता असल्याचे मतही दरेकर यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

सीएसआरच्या माध्यमातून आपण कुठलेही सामाजिक काम उभे करू शकतो. नागपूरला भाजपा नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ३०० कोटी रुपयांचे कॅन्सर हॉस्पिटल उभे करण्यात आले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी स्थापन केलेल्या वैद्यकीय कक्षाला जास्त किमतीची काही ठराविक औषधे लागायची. त्यासाठी सीएसआर निधीची मदत घेण्यात आली, असेही त्यांनी सांगितले.

आपण सुमारे दहा-बारा हजार कोटीची उलाढाल असणा-या बँकेचे संचालक आहोत, त्यामुळे बँकिंग असोसिएशनच्या माध्यमातून या कामात काही हातभार लावता आला तर तसेही निश्चितपणे नियोजन करू, अशी ग्वाही दरेकर यांनी दिली. याप्रसंगी हिरवळ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किशोर धारिया, ईडीचे उपसंचालक डॉ. उज्ज्वकुमार चव्हाण, महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त राहुल मोरे, क्रिसिलचे संचालक अभय कंटक, प्रेरणा लांगा, रुसेन कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -