घरमुंबईSiddhivinayak Mandir : मुख्यमंत्री शिंदेंकडून सिद्धिविनायक मंदिराबाबत महत्त्वाची घोषणा

Siddhivinayak Mandir : मुख्यमंत्री शिंदेंकडून सिद्धिविनायक मंदिराबाबत महत्त्वाची घोषणा

Subscribe

मुंबई : प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाचा व पुनर्नियोजनाचा प्रकल्प मुंबई महापालिकेने हाती घेतला आहे. याचबाबत आज (ता. 11 मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेकडून सिद्धिविनायक मंदिरासाठी 500 कोटींची तरतूद करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली आहे. (Important announcement about Siddhivinayak Mandir by CM Eknath Shinde)

हेही वाचा… Coastal Road : कोणकोणत्या वाहनांना कोस्टल रोडवर असणार परवानगी? नियम काय आहेत? वाचा सविस्तर

- Advertisement -

मुंबईतील बहुप्रतिक्षित अशा कोस्टल रोडचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिद्धिविनायत मंदिराच्या पुनर्नियोजनाच्या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, सिद्धिविनायक मंदिराचा डीपीआर सुद्धा चांगला झाला पाहिजे. हे मंदिर सुद्धा अजून उत्कृष्ट सुंदर झाले पाहिजे. त्यामुळे मंदिराच्या सुशोभिकरणासाठी आणि पुनर्नियोजनासाठी उज्जैन मंदिराच्या आर्किटेक्चरची नियुक्ती करण्यात येणार आहे. सिद्धीविनायक मंदिर परिसराचा उज्जैनच्या महाकाल मंदिराप्रमाणे विकास करण्यात येईल, यासाठी महापालिकेमार्फत 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली आहे.

सिद्धिविनायक मंदिराच्या सुशोभीकरणाची आवश्यकता का?

प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत असून भाविकांना अधिक सुविधा देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून विशेष प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. सिद्धिविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्यामुळे मंदिरावर हल्ल्याच्या धमक्या सतत येत असतात. अनेकदा मंदिराला धोका असल्याची चर्चा होत असते. त्यामुळे काही वर्षांपूर्वी मंदिराभोवती संरक्षक भिंत बांधण्यात आली. मात्र दिवसेंदिवस मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत असल्यामुळे सध्या असलेल्या सुविधांमध्ये वाढ करण्याची गरज आहे. त्यात सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच मंदिर परिसराचाही कायापालट करण्याचा प्रकल्प पालिका प्रशासनाने हाती घेतला असल्याचे सांगितले आहे. पालिकेच्या जी उत्तर विभागाने या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. प्रकल्पाचा नियोजन आराखडा तयार करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यात येणार असून त्याकरीता पालिकेने निविदा मागवल्या आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार, वास्तुशास्त्रज्ञ यांची यातून निवड केली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -