घरमुंबईBREAKING : एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या घरी प्राप्तिकर विभागाचा छापा

BREAKING : एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या घरी प्राप्तिकर विभागाचा छापा

Subscribe

मुंबई : एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या घरी प्राप्तिकर विभागाने छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. आज (ता. 08 फेब्रुवारी) अचानक पडलेल्या या छाप्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर, एका माजी आमदाराच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या प्रदीप शर्मा यांच्या घराची प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून झाडाझडती करण्यात येत आहे. प्रदीप शर्मा हे मुंबई पोलीस दलातील माजी पोलीस अधिकारी आहेत. त्यांची एन्काउंटर स्पेशलिस्ट अशी ओळख बनलेली होती. प्रदीप शर्मा हे मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपी आहेत. ते वर्षभरापासून अधिक काळ तुरुंगात होते. (Income Tax Department raids encounter specialist Pradeep Sharma’s house)

हेही वाचा… Vijay Wadettiwar : “अशा व्यक्तींकडून काय अपेक्षा ठेवायची?” सिद्दीकींच्या राजीनाम्यावर वडेट्टीवारांची टीका

- Advertisement -

काही महिन्यांपूर्वीच प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टातून जामीन मंजूर झाला आहे. त्यानंतर आता प्रदीप शर्मा यांच्या घरी प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. सकाळी 7 वाजताच्या सुमारास प्राप्तिकर विभागाचे अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरी दाखल झाले आहेत. परंतु, ही छापेमारी नेमक्या कोणत्या प्रकरणात करण्यात आली आहे, हे अद्यापही कळू शकलेले नाही. मात्र, एका माजी आमदाराशी संबंधित हे प्रकरण आहे. माजी आमदाराच्या प्रकरणाचा तपास प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. ज्यामुळे शर्मांच्या मालमत्तेची पडताळणी केली जात आहे. त्याच अनुषंगाने प्रदीप शर्मा यांच्याशी त्या माजी आमदाराच्या प्रकरणाचा काही संबंध आहे का, अशा प्रकारे हा तपास करण्यात येत आहे. प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी येथील घराची प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून झडती घेण्यात येत आहे.

सकाळी सात वाजताच्या सुमारास प्रदीप शर्मा यांच्या घरी प्राप्तिकर विभागाचे अधिकारी दाखल झाले. त्यामुळे गेल्या 8 तासांपासून अधिक वेळ ही कारवाई सुरू आहे. परंतु, जबरदस्तीने ही कारवाई करण्यात येत असून प्रदीप शर्मा आणि त्यांच्या पत्नीचा फोनही जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर प्रसार माध्यमांशी बोलण्यासही प्रदीप शर्मा आणि त्यांच्या कुटुंबियांना मज्जाव घालण्यात आला आहे.

- Advertisement -

रमेश दुबे यांच्या घरावर छापा…

माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्याव्यतिरिक्त प्राप्तिकर विभागाने महाराष्ट्राचे आमदार आणि व्यापारी रमेश दुबे यांच्या घरावरही छापा टाकला आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात दुबे यांच्यावर बनावट कागदपत्रांचा वापर करून जमीन हडप केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच प्रकरणात हा छापा टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या छाप्याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -