घरमुंबईMaharashtra Politics : मनसेत धुसफूस! राज ठाकरेंनी परशुराम उपरकरांना पक्षातून काढले

Maharashtra Politics : मनसेत धुसफूस! राज ठाकरेंनी परशुराम उपरकरांना पक्षातून काढले

Subscribe

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) नुकत्याच पुणे दौऱ्यावर होत्या. तेव्हा त्यांनी पुण्यातील मनसे नेता साईनाथ बाबर यांना लोकसभा निवडणुकीत मोठी संधी देण्याबद्दल सुतोवाच केले. यानंतर पुन्हा एकदा पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) नाराज झाल्याचे चित्र आहे. अशातच आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनसेतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी बरखास्त केल्यानंतर पक्षाचे सरचिटणीस परशुराम उपरकर हे नाराज होते. अशातच आता परशुराम उपरकर यांचा पक्षाशी काही संबंध नसल्याचे मनसे कार्यालयाने जाहीर केले आहे. (Maharashtra Politics MNS is in shambles! Raj Thackeray expelled Parashuram Uparkar from the party)

हेही वाचा – Accident News : परीक्षेला निघाले मात्र ओव्हरटेकच्या नादात जीव गमावला; तीन भावंडांचा दुर्दैवी मृत्यू

- Advertisement -

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा संघटना बळकट करण्यासाठी सक्रीय झाले आहेत. परंतु अंतर्गत नाराजीमुळे पक्षातील नेते, पदाधिकारी पक्षाला रामराम करत आहेत. परशुराम उपरकर हे मनसेचे सरचिटणीस होते. मात्र राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्यानंतर परशुराम उपरकर हे नाराज होते. ते माजी आमदार म्हणून मतदारसंघात कार्यरत होते. मात्र गेल्या वर्षभरापासून ते पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमाला किंवा व्यासपीठावर उपस्थित नसायचे किंवा बैठकांनाही गैरहजर असायचे. अशातच आता आज मनसे कार्यालयाने पत्रक काढून परशुराम उपरकर आणि प्रविण मर्गज यांचा पक्षाशी कुठलाही संबंध नाही असं जाहीर केले आहे.

- Advertisement -

मनसे नेते शिरीष सावंत यांनी पत्र काढून म्हटले की, राज ठाकरे यांच्या आदेशाने परशुराम उपरकर आणि प्रविण मर्गज यांचा यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षासोबत कोणताही संबंध असणार नाही. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असं कळवले आहे. त्यामुळे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनसेची अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.

उपकरांच्या नाराजीचं कारण काय?

मागील काळात राज ठाकरेंचा कोकण दौरा झाल्यानंतर याठिकाणची जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली होती. त्यानंतर कोकणासाठी मनसे संपर्क नेत्यांची घोषणा करण्यात आली होती. या संपर्क नेत्यांनी जिल्ह्यातील कार्यकारणीची निवड करताना बरखास्त केलेल्यांना संधी दिली. यावेळी काही संपर्क नेत्यांनी मर्जीतले पदाधिकारी नेमले. त्यामुळे सरचिटणीस असलेले परशुराम उपरकर हे नाराज होते आणि तेव्हापासून ते पक्षापासून दूर होत गेले. त्यानंतर आता त्यांचा पक्षाशी काहीही संबंध नाही, असं जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे आता कार्यकर्त्यांशी बोलून पुढील दिशा काय असेल ते ठरवून असे परशुराम उपकर यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : “देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातील गुंडगिरीवर चाय पे चर्चा करावी”, संजय राऊतांचा टोला

परशुराम उपरकर कोण?

नारायण राणे यांनी शिवसेनेची साथ सोडल्यानंतर परशुराम उपरकर हे कोकणात शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले. त्यांनी कोकणात शिवसेना रुजवण्याचं काम केलं. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी उपकरांना विधान परिषदेत आमदारकी दिली. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर परशुराम उपकर यांचे स्थानिक शिवसेना नेत्यांशी मतभेद झाले आणि त्यांनी राज ठाकरे यांच्या मनसे पक्षात प्रवेश केला. मात्र आता मनसेने त्यांना पक्षातून बाहेर काढले आहे. त्यामुळे परशुराम उपकर यांना कुठल्या पक्षात संधी मिळते का? हे पाहावे लागेल. कारण त्यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगला जनसंपर्क आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -